शासनाच्या हमी भावाप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समित्यांनमध्ये कापूस व मका खरेदी करण्यात यावी.

0

सिल्लोड प्रतिनिधी ( विनोद हिंगमीरे) सिल्लोड तालुक्यातील भराडी वडाळा सह परिसरात मोठ्या प्रमाणावर कापूस तसे मका पिकाची लागवड करण्यात येते. यावर्षी पाऊस पाणी चांगला असल्याने व मध्येच अतिवृष्टी झालेली आहे आणी शेतकऱ्यांवर अस्माणी संकट आलेले आहे. व मका पिकाचे सुद्धा भरघोस म्हणावे तसे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. व अतिवृष्टीने सुध्दा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहेत. त्याचप्रमाणे कापसाचे उत्पन्नही चांगल्याप्रकारे होताना दिसून येत होते. मात्र अतिवृष्टीने कापसाच्या उत्पन्नातही घट होतांना दिसून येतआहे. मात्र या परिसरात व्यापाऱ्यांकडून कापूस हा चार हजार चारशे रुपये तर मक्का अकराशे रुपये भावाने खरेदी करण्यात येत आहेत परिसरातील काही व्यापारी मात्र हे भाव सुद्धा बाजूला ठेवून खराब मक्याच्या वेगळा भाव आणि चांगल्या मक्याचा वेगळा भाव तसेच मका प्रमाणे कापसाचा सुद्धां ओल्या कापसाचा वेगळा भाव आणि सुक्या कापसाचा वेगळा भाव अशाप्रकारे अव्वाच्या सव्वा दराने व्यापारी शेतकऱ्यांकडून कापूस व मका खरेदी करतानाचे चित्र या परीसरात दिसून येत आहे.त्वरीत कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शासनाच्या हमी भावाप्रमाणे कापूस व मका खरेदी करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here