मंजुराच्या स्थंलातरणामुळे गावे,तांडे वाड्या वस्त्या पडल्या ओस

0

सिल्लोड (  प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे) केळगाव परिसरातील तांड्या वाड्या वस्त्यावरील ग्रामस्थ आपल्या कुंटुबासह मोठ्या संख्येने ऊसतोडीसाठी स्थलांतरीत झाल्यामुळे तांडे वाड्या वस्त्या झाल्या असून त्यांचा परिणाम बाजारपेठेवर झाला आहे तर दुसरीकडे मजूर मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे,केळगाव परिसरात मजूर अल्पभुधारक शेतकरी हे दरवर्षी ऊसतोडीसाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतर करतात यंदा अन्य वस्त्यावरील नागरीकही मोठ्या प्रमाणात गेले आहेत हा परिसर भागायती असून देखील येथील ग्रामस्थ ऊसतोडीसाठी जातात यासाठी मुकादमाकडुन त्यांना लाखरुपर्या पर्यत उचल मिळत असतो मिळालेली ही रक्कम लग्न दवाखाण्याचा खर्च,कुंटुबाचा उदरनिर्वाहाचा खर्च केला जातो त्यामुळे त्यांना कोणत्याही बॅकेकडे पैशासाठी हात पसरावे लागत नाही कोणाकडून कर्ज अथवा उसनवारीने पैसे मोजावे लागत नाहीत,आधरवाडी,कोल्हाळा,तांडासह परिसरातील गाव तांड्यातुन ऊसतोड कामगाराचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाल्याने गाव ताडे ओस पडत आहे असल्याचे चित्र दिसत आहे गावात भक्त वूध्दाचा वावर दिसत आहे
परिसरात सुरुवाती पासुनच पावसाने हाहाकार माजवला आहे,ऊसतोडीसाठी स्थंलातरीत होण्याअगोदर हे मजूर आपल्या शेतात ज्वारी बाजरी पेरणी करतात दसर्‍याच्या वेळेस घरच्या शेतातील काढणीची कामे आटोपल्यानंतर घरची जबाबदारी वूध्द आई वडिलावर टाकून ते ऊसतोडीसाठी जातात अगदी लहान असलेल्या मुलांना सोबत नेतात संसाराचा गाडा चालवण्याठी व पोटाची खडगी भरण्यासाठी आपल्या मुक्या जनावरांसोबत थंडीची काळजी न करता ऊस तोडीसाठी मजुर कारखान्याकडे निघाल्याचे चित्र दिसत आहे.दुसरीकडे ऊसतोडीसाठी मजुर गेल्यामुळे शेतकर्‍यांना मंजूराच्या शोधार्थ गावोगावी भटकंती करावी लागत आहे कापुस वेचणीसाठी व ईतर कामासाठी मजूर मिळत नाहीत मंजूराअभावी कामे वेळेवर होत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत,आधरवाडी,कोल्हाळा,तांडासह परिसरातील गाव तांड्यातुन ग्रामस्थ आपल्या कुंटुबासह मोठ्या प्रमाणात ऊसतोड स्थंलातर होताना दिसत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here