मादनी ता.सिल्लोड येथे शिवसेना सदस्य नोंदणीला सुरुवात 

0

सिल्लोड ( प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे) शिवसेना प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना सदस्य नोंदणी उपक्रम राबविण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार तथा राज्याचे महसूल व ग्राम विकास खात्याचे मंत्री ना.अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली सिल्लोड तालुक्यातील मादनी येथील शिवसेना शाख प्रमुख सुनील कालभिले यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना नोंदणीला या रोजी सुरुवात करण्यात आले. यावेळी शिवसेना शाखा प्रमुख सुनिल कालभिले, उप प्रमुख विष्णू अपार ,युवा सेना शाखाप्रमुख सलीम भाई शहा ज्येष्ठ शिवसैनिक ,अंबादास
कालभिले ,गजानन पोटदुखे, आत्माराम तातडे, प्रवीण कालभिले ,सुरेश कालभिले, दादाराव काळे, राधाबाई कालभिले ,लक्ष्मण कालभिले, विलास कालभिले,यांच्यासह शिवसेना व युवा सेना कार्यकर्ते व नागरिक हजर होते.
मादनी शाखा प्रमुख गणातील शिवसेना पक्षाची रूपरेषा समोर ठेऊन सदस्य नोंदणी करून जवळपास तीनशेच्यावर नविन कार्यकर्ते तयार करण्यात येईल, अशी माहिती सुनील कालभिले यांनी mb news 24tass बोलताना दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here