शिवना ता. सिल्लोड येथे विधृत डिपीला लागली अचानक आग, कोणतीही जीवित हानी नाही

0

सिल्लोड ( प्रतिनिधी :- विनोद हिंगमीरे ) शिवना ता. सिल्लोड येथील गावाच्या मधोमध बुगदादी हजरत दर्गा परिसरात शेवडी विधृत डिपीला अचानक आग लागल्याने परिसरात नागरिकांची एकच धावपळ उडाली होती. ही घटना दुपारी एकच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक वृत्त असे की, गावाच्या मधोमध बुगदादी हजरत दर्गा जवळ शेवडी डिपी बसवलेली असून या विधृत डिपीला तार कुंपण नसल्याने डिपीच्या खाली डुकरांचा मुक्त संचार नेहमी असतो. ईतकेच नव्हे विधृत डिपी जवळ परिसरातील लहान-लहान मुले दररोज खेळतात.डिपीला गावाच्या बाहेर सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे या साठी अनेक दिवसापासून नागरिक संबंधित कार्यालयात चकरा मारीत असून या गंभीर समस्याकडे संबंधित विभाग बघ्याची भूमिका घेत आहे. सोमवारी जवळपास एक वाजेच्या सुमारास अचानक डिपीला लागलेल्या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून लागलेली आगीला बुझवण्याचे काम गावातील कबीर खान, ईरफान अत्तार, तारेख चाऊस व सोहेल खान यांनी परिश्रम घेतले. ज्यामुळे एक मोठा अनर्थ टळला. सदरील विधृत डिपीला गावाच्या बाहेर सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी शिवना ग्राम पंचायतने ठराव सुद्धा घेतलेला असून त्या ठरावाची प्रत संबंधित विभागाला पाठविण्यात आलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here