तालुक्याच्या डोंगरी भागातून सायाळ नामशेष

0

सिल्लोड ( प्रतिनिधी:-विनोद हिंगमीरे ) तालुक्याच्या डोंगरी भागातून सायाळ नामशेष होत आहे – मांसासाठी चोरटी शिकार ,काट्यांचा तंत्र व अघोरी विद्यें साठि दुरूपयोग दि.2 ते 8 ऑक्टोबर, वन्यजीव सप्ताह सिल्लोड-दरवर्षी राष्ट्रपिता म.गांधी यांच्या जयंती पासून देशभर वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो.त्यांनी अहिंसा हे तत्व जगास दिल्यामुळे या आठवड्यात वन्यप्राणी ,वने,वनस्पती आदींचे संरक्षण व संवर्धन या बाबत जागृती केली जाते. तालुक्याच्या उत्तरेस असलेल्या अजिंठा डोंगर भागात तसेच पळशी लगतच्या डोंगरी भागात “सायाळ” हा प्राणी आढळतो. या प्राण्याची संख्या रुचकर मांसामुळे शिकार होत असल्याने कमालीची रोडावली आहे. या प्राण्याची शिकार न करता संरक्षण करावे या साठी सिल्लोड येथील अभिनव् प्रतिष्ठानचे डॉ. संतोष पाटील हे तालुक्यातील फासेपारधी तसेच, हळदा, डकला, पिंपळदरी,लेनापूर,सावरखेडा, आमसरी आदी भागातील शिकार करणारे ,हॉटेल ,ढाबे मालक यांचे प्रबोधन करत आहे. .सायाळ अथवा साळिंदर हा प्राणी हिस्ट्रीसीडी म्हणजे कृतक(कुरडणाऱ्या ) गणातील असून त्याचे शास्त्रीय नाव हिस्तेरिक्स इंडिका असे आहे.हा बिळे अथवा डोंगर,खडकांची कपार यात राहणारा शाकाहारी प्राणी आहे.झाडांची खोड साल ,गवत झाडपाला, फळे,झुडूप आदींवर हा गुजराण करतो.पूर्ण वाढ झालेल्या सायाळचे वजन 14 ते 17 किलो पर्यन्त असते.याच्या अंगावर असलेल्या काट्यांमुळे हा प्राणी कुतूहलाचा विषय होतो मात्र ते काटे नसून जाड व कडक केस असून निसर्गाने त्यास स्व संरक्षणासाठी बहाल केलेले आहेत.ते केरॅटिन नावाच्या प्रथिनांपासून बनलेले आहेत. सायाळ झाडांची साल आवडीने खाते कारण त्यातून तिला फायबर, क्षार व आद्रता मिळते .मृत जनावरांचे शिंगे, हाडेही फस्त करते कारण त्यातुन तिला दातांच्या व या जाड केसांच्या वाढीस आवश्यक असलेले कॅल्शियम व फॉस्फरस मिळते.निसर्गातील स्वच्छताही ती या योगाने करते.जमिनीत बिळे करून राहत असल्याने ती जमीन भुसभुशीत करते व त्यायोगे पावसाचे पाणी जमिनीत उत्तम प्रकारे मुरते.काहि तणवर्गिय वनस्पतीचे मुळे ही खात असल्याने तण नियंत्रण ही ती करते. या प्राण्याची फासेपारधी तसेच हळदा, डकला, लेनापूर, पिंपळदरी, आमसरी,नाटवी,या डोंगरी भागात खाण्यासाठी हत्या होत ,निसर्ग साखळी विस्कळीत होत आहे ही पर्यावरणासाठी चिंतेची बाब आहे.सायाळचे काटे तंत्र व अघोरी विद्वेसाठीही वापरात येतात.एम्ब्रॉयडरी व विणकामत ते वापरले जातात. शोभेची वस्तू म्हणून ही ते मिरवले जातात. खाद्य तेलात ते टाकण्याचा प्रघात आहे.हे काटे ठेवलेले तेल सांधेदुखी वर मालीशसाठी वापरतात या व अनेक कारणांमुळे याची सर्रास चोरटी शिकार होत आहे.याच्या बिळात धुर सोडून यास आधी बिळातून हुसकावले जाते व त्यास लागूनच पिंजरा लावला जातो .या पिंजऱ्यात ते अलगद अडकते.निशाचर असल्याने व जास्त लांबचे दिसत नसल्याने वाहनां सोबत लहान सहान अपघातही होतात मात्र असे जखमी सायाळ वाहन धारक दगडाने मारतात व आयती शिकार म्हणून घरी नेतात.हिचे मांस रुचकर व दुर्मिळ असल्याने एक सायाळ 3 ते 4 हजार रु पर्यन्त विकली जाते.सायाळ च्या काट्यापासून जरी वाचले तरी कायद्याच्या कचाट्यात अडकू शकता.शेड्युल 4 अंतर्गत हा प्राणी संरक्षित करण्यात आला आहे. १९७२ च्या वन्यजीव अधिनियम ९,४९,४८(अ)नुसार याची हत्या करणे प्रसतिबंधीत असून 3 वर्षे शिक्षाही यामुळे होऊ शकते म्हणून ढाबे व हॉटेल चालक,शिकारी यांनी सायाळच्या वाटेस जाऊ नये-डॉ. संतोष पाटील,अभिनव् प्रतिष्ठान, सिल्लोड पूर्ण वाढ झालेल्या सायाळचे वजन १४ ते १७ किलो भरते.दोन ते अडीच फूट लांबी व काट्यामुळे २ फुटापर्यंत उंची असते. आखूड पाय असून सस्तन असून एका वेळेस २ ते ४ पिल्ल जन्मास घालते.रंग काळा असलेला हा प्राणी मंद चालीचा असल्याने मानवाकडून सहज हत्या होते👈➖ 👉सायाळ अंगावर काटे सोडते हा गैर समज आहे.जुने काटे(रठ केस) गळून कालांतराने त्या जागी नविन काटे येतात. यास ‘शेडिंग ‘असे म्हणतात.👈

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here