
देवळा – डाॅ.जितेंद्र आव्हाड युवा मंच महाराष्ट्र नाशिक जिल्हा सरचिटणीस पदी सतिश परदेशी यांची निवड देवळा येथील जिल्हाध्यक्ष श्री.सचिन सूर्यवंशी यांच्यावतीने आज जिल्ह्याची कार्यकारणी जाहीर करण्यात आली,
पुरोगामी विचारांचा वारसा जपणारे नामदार डॉ . जितेंद्रजी आव्हाड साहेब यांच्या आदेशाने तसेच प्रदेशाध्यक्ष अॅड .प्रमोद सरोदे यांच्या मार्गदर्शणाखाली नासिक जिल्हा अध्यक्ष श्री सचिन सूर्यवंशी यांच्या प्रयत्नातून श्री.सतीष रतनसिंग परदेशी रा मनमाड हे अनेक वर्षांपासून राजकीय शैक्षणिक सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे या अनुषंगाने यांची *नाशिक जिल्हा *सरचिटणीस* पदी नियुक्ती करण्यात येत आहे . ही जबाबदारी समजून फुले शाहू , आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा चालवत ठेवावा व आपल्या हातून सामाजिक कार्य करीत रहावे असे जिल्हा अध्यक्ष सचिन सूर्यवंशी यांनी सतीश परदेशी यांना सोशल मीडिया वरून शुभेच्छा देऊन ईमेल द्वारे नियुक्तीपत्र देऊन मार्गदर्शन केले तसेच संपूर्ण जिल्ह्यातून यांचे अभिनंदन चा वर्षाव होत आहे,
