
सिल्लोड – प्रतिनिधी:-विनोद हिंगमीरे
शासनाच्या विविध योजना असतात , परंतु जनसामान्य माणसाला माहीत होत नाही, त्यामुळे लाभार्थी वंचित राहतात अशा योजना प्रथम जनसामान्य माणसा पर्यंत पोहचविण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापक नामदेवराव साखळे यांनी केले.
तालुक्यातील मांडणा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. नामदेवराव साखळे यांची लिहा खेडी ग्रांमपंचायतच्या प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यानिमित्ताने लिहा खेडी येथील गावकऱ्यांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयात त्यांचा स्वागत सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता केला होता,
यावेळी ते बोलत होते होते, पुढे बोलतांना म्हणाले की, शासकीय सेवेत असतांना मला ही संधी मिळाली आहे, कधी कोणालाही अडचण आल्यास आपणा सर्वांच्या सेवेसाठी हजर असेन सर्व गांवकऱ्यांनी मला सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
याप्रसंगी विविध सहकारी संस्थेचे चेअरमन म्हणाले की, आपल्या राजकीय मतभेद असतील परंतु गाव म्हणुन विकासाचा मूद्दा समोर आला की सर्व मतभेद विसरून सर्व गाव एकत्रित येत असते, त्यामुळे आता पर्यंत गावाचा विकास साधता आलेला आहे, माजी उपसरपंच अंबादास सपकाळ म्हणाले की,मागे अनेक विकास कामे झाली, याही प्रशासकीय अधिकारी नामदेवराव साखळे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार आहे असे सांगितले.
माजी सरपंच शेषराव फरकाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमास ,माजी उपसरपंच संतोषराव पाटील साखळे, बाळाराम पा.साखळे, शंकरराव खांडवे, राजू मिया देशमुख,युवा कार्यकर्ते सुनील साखळे,विष्णू साखळे, गणपत पाटील सरोदे, उत्तमराव पाटील साखळे, तंटामुक्तीचे अध्यक्ष नवनाथ साखळे , माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष कृष्णा पाटील साखळे ,गंजीधर पाटील बावस्कर ,विष्णू फरकाडे ,विष्णू साखळे ,शिवराम पाटील साखळे,माजी पंचायत समिती सदस्य गजानन जाधव, पोपटराव साखळे, ग्रामसेवक श्री. वाहुळ गजानन वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ठमाजी साखळे केले आभार विलास बावस्कर यांनी मानले .
