घाटनांद्रा तिडका रस्ता बनला मृत्यूचा सापळा

0

सिल्लोड ( प्रतिनिधी. :-विनोद हिंगमीरे) सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा ते तिडका हा दहा किलोमीटरचा रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून अपघाताला निमंत्रण देत आहे या रस्त्यामध्ये सात किलोमीटरचा घाट असून मृत्यूला आमंत्रण देत आहे घाटनांद्रा तिडका रोडची दयनीय अवस्था या मथळ्याखाली mb news 24tass प्रकाशित केले होते त्याची दखल घेत घाटातील धोकादायक पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराने थातुरमातुर बांधकाम करून त्या मुलावर माती टाकलेली आहे त्यामुळे त्याठिकाणी मोठमोठे खड्डे तयार झाले असून त्याचा त्रास आजतागायत वाहनधारकांना होत आहे यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे खानदेश माझा मध्ये जाण्यासाठी मार्ग सोपा व कमी अंतराचा असल्याने या मार्गावर रहदारी वाढली आहे मात्र मागील झालेल्या मुसळधार पावसामुळे घाटांमधील रस्ता हा ठिकाणी वाहून गेला आहे तर काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला मोठे भगदाड पडले आहे त्यामुळे वाहनधारकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे रस्त्याच्या दोन्ही कडेला पाण्याच्या जास्त प्रवाहामुळे मोठ्या नाल्या पडले आहेत. घाटाला तीव्र वळणे असल्यामुळे वरचढ जास्त असल्या कारणाने वाहन वळवायला वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे वालावल रस्ता जास्त खराब झाला असून वाहन घाट चढायला चांगलीच तारांबळ उडत आहे पाणी वाहण्यासाठी ठेकेदाराने रोडच्या साईडला चर न खोदं ल्यामुळे डोंगरा वरून येणाऱ्या पाण्यामुळे रस्ताच वाहून गेला आहे व रस्त्याच्या शेजारी तीन ते साडेतीन फुटाच्या चाऱ्या पडल्या आहे त्यामुळे खालून येणाऱ्या व वरतून जाणाऱ्या वाहन धारकांना खूप त्रास सहन करावा लागतआहे ज्या ठिकाणी रस्ता खसला आहे त्या ठिकाणी एकच वाहन जीव मुठीत धरून रस्ता पार करावा लागत आहे तर डोंगराच्या खाली घाट संपल्यानंतर रोडवर ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत काही महिन्यांपूर्वी या रोडचे काम पूर्ण झाले होते मात्र ही लगेच खराब झाल्यामुळे जनसामान्य मधून सार्वजनिक बांधकाम विभागात बद्दल रोष व्यक्त होत आहे याविषयी विचारणा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रशांत खेडकर यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क झाला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here