
मनमाड – सकारात्मक चर्चा व विनम्र निवेदन” 🙏🏻
सर्व सन्माननीय सदस्य वर्ग,
सप्रेम नमस्कार,
मनमाड शहरात सन्मा.जिल्हाधिकारी साहेब यांचे आदेशाने अत्यंत जाचक असा सम विषम कायदा सध्या मनमाड नगरपरिषद कठोर पणे राबवित आहे.
यावर मनमाड शहर व्यापारी महासंघाच्या वतीने मान.मुख्याधिकारी साहेब यांना वेळोवेळी निवेदन दिले आहे. मात्र यांवर व्यापारी हिताचा काहीही निर्णय होवू शकला नाही. अशा परिस्थितीत व्यापारी महासंघाचे वतीने सन्मा.आमदार सुहास आण्णा कांदे यांच्याशी संपर्क साधला.
सन्मा.आमदार साहेब यांनी व्यापारी महासंघाचे प्रतिनिधी तसेच नगरपरिषद चे मान.मुख्याधिकारी साहेब यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती. या बैठकीत अत्यंत अन्यायकारक अशा सम विषम कायदा रद्द करावा. या आशयाने अत्यंत आग्रही मागणी करण्यात आली.
यामध्ये संपुर्ण महीनाभराचे खर्च तसेच महीनाभराचे व्यापारी देणं केवळ 12 दिवसांच्या व्यापारा मध्ये कसे पुर्ण करायचे यासंदर्भात संपुर्ण विस्तृत गा-हाणे यावेळी मांडण्यात आले.
या बैठकी दरम्यान सन्मा.आमदार साहेब यांनी सन्मा जिल्हाधिकारी साहेब”* यांचेशी संपर्क साधला. सन्मा.जिल्हाधिकारी साहेब यांनी सायंकाळी पुन्हा संपर्क करण्याचे ठरले.
यावेळी सन्मा. आमदार साहेब यांनी मान.मुख्याधिकारी साहेब यांना स्थानिक पातळीवर सुचक सकारात्मक निर्णय घेवून व्यापारी वर्गास दिलासा देण्यास सुचविले.
यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री राजाभाऊ पारीक, जेष्ठ मार्गदर्शक श्री. रीखबशेठ ललवाणी,उपाध्यक्ष श्री.सुरेश शेठ लोढा,किसनदादा बंब,श्री. कुलदीप सिंग चोटमुरादी,श्री.अनिल शेठ गुंदेचा कार्याध्यक्ष श्री. निलेश व्यवहारे,सचिव श्री. राजकमलजी पांडे,खजिनदार श्री. मनोज जंगम, सुवर्णकार संघाचे अध्यक्ष श्री अरूण भाऊ सोनवणे, जेष्ठ कार्यकारिणी सदस्य श्री. शामशेठ शिरोडे,श्री. महावीर ललवाणी, श्री. गुरूदिप शेठ कांत,श्री. हरदिपसिंग चावला,श्री. जुझर भाई भारमल आदी.उपस्थित होते.
-: आपला विश्वासू:-
श्री. राजाभाऊ पारीक
अध्यक्ष
मनमाड शहर व्यापारी महासंघ
