शेतकरी विरोधी धोरण कांदा निर्यात बंदी हटवा स्वारीप ची मागणी

0

येवला – शेतकरी विरोधी धोरण कांदा निर्यात बंदी हटवा स्वारीप ची मागणी­
सरकारने अचानक कांदा निर्यात बंदी जाहीर करून शेतकऱ्यांच्या कांद्याचा वांदा केला आहे एकीकडे गेल्या सहा महिन्यापासून जगावर कोरोना सारख्या महाभयंकर आजाराच्या साथीने थैमान घातले असता जगाचा पोशिंदा म्हणजेच शेतकरी हा आर्थिक अडचणीत असताना सरकारने करोना कालावधीमध्ये दोन वेळेस कांदा निर्यात बंदी घालून शेतकऱ्याला आर्थिक संकटात ढकलण्याचे काम केल्याचे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुका सचिव शशिकांत जगताप यांनी पत्रकात नमूद केले आहे
सध्या परिस्थिती मध्ये शेतकरी मोठ्या अडचणीत व चिंताग्रस्त वाटचाल करीत असताना पावसामुळे येवला तालुक्‍यात अनेक शेतकऱ्यांच्या मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन मका पीक पावसामुळे भुईसपाट झाले असता शासनाकडून कुठल्याही प्रकारची मदत व भरपाई देण्यासाठी आराखडा किंवा नियोजन करण्यात आलेले नाही परंतु उलट शेतकऱ्याच्या कांदा निर्यातबंदी व धोरण आखून शेतकरी मोठ्या संकटात अडकल्या गत शेतकरी वर्गामध्ये चिंतेची व संतापाचे लाट पसरली आहे म्हणून सरकारने शेतकरी वर्गावर अन्याय न करता तात्काळ कांदा निर्यात बंदी हटवावे अशी मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने शशिकांत जगताप यांनी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here