वांगी बुद्रुक येथे ग्रामपंचायत  प्रशासक डि एम देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहन

0

सिल्लोड ( प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे ) सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक येथील ग्रामपंचायतचे सरपंच महेश पाटील यांचा कार्यकाळ बारा सप्टेंबर रोजी संपलेला असुन ग्रामपंचायत  प्रशासकीय अधिकारी पदी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक डि एम देशमुख यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात डि एम देशमुखयांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय अध्यक्ष प्रकाश काकडे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.यावेळी ग्रामसेवक कोळी साहेब,पोलीस पाटील चंद्रकांत जाधव,रघुनाथ साळवे,भगवान साळवे,सुरेश साळवे,नानासाहेब गायकवाड शिक्षक कृष्णा सपकाळ,संतोष दाभाडे,रामदास सतुके,खान उस्मान,शेख आवेस,सपना कांबळे,मंजुषा कुलकर्णी,वैशाली काकडे,ताराबाई काकडे,कौसाबाई शेंद्रे आदी ग्रामस्थ व शिक्षक वृंद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here