प्रज्ञा जागृती प्राथमिक शाळेत कृतीपत्रिकांचे वाटप

0

सिल्लोड ( प्रतिनिधी : विनोद हिंगमीरे ) सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथील प्रज्ञा जागृती प्राथमिक शाळेने व्हाट्सअप फेकबुक वर ग्रुपवर देण्यात येणाऱ्या अभ्यासा पासून वंचित असणाऱ्या विदयार्थ्यांना संस्थेचे सचिव अशोक गरुड यांच्या प्रेरणेने सर्व शिक्षकांच्या प्रयत्नातून मुख्याध्यापक कुशल देशमुख यांच्या हस्ते एकत्रित सर्व समावेशक विषयाच्या तयार केलेल्या कृतीपत्रिकांचे वाटप करण्यात आले.
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या संसर्गाने शाळा बंद आहे. परंतु शाळा बंद असतांनाही शिक्षण विभागाने कठोर पावले उचलत शाळा बंद पण शिक्षण सुरू या तत्वानुसार व्हाट्सप फेसबुक द्वारे विदयार्थी कायम स्वरूपी प्रवाहात ठेवण्यासाठी ऑनलाईन शिक्षा पद्धती सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते. ती शिक्षा पद्धती सुरू असताना बरेच विदयार्थी ज्या पालकाकांडे व्हाट्सअप व्यवस्था नाही किंवा साधा मोबाइल आहे असे विदयार्थी अभ्यासा पासून वंचित आहे अशा 1 ली ते 7 वि च्या विद्यार्थ्यां साठी कृतीपत्रिका तयार करून त्या सोशल डिस्टनसिंग चा नियम पाळत वाटप करण्यात आल्या.
यावेळी पालक समाधान तायडे, रंगनाथ पारखे, विजय गोमलाडू ,कृष्णा वानखेडे,पंडित जाधव, रामेश्वर जैवळ व सहशिक्षक व कर्मचारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here