बोरगांव बाजार व बोरगांव सारवणी पुर्णा पात्रातून अवैध वाळू उपसा

0

सिल्लोड ( प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे ) बोरगांव बाजार व बोरगांव सारवणी पुर्णा पात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळु तस्करा विरुध्द तहसीलदार रामेश्वर गोरे व उपविभागीय अधिकारी सिल्लोड यांनी तलाठी इंगळे यांना कारणे दाखवा नोटीस व याप्रकरणी  गुन्हा दाखल करण्याचे दिले आदेश,

सिल्लोड तालुक्यातील बोरगांव सारवणी व बोरगांव बाजार शिवारातील पुर्णा नदीपात्रातून वाळू तस्कराकडून अवैध वाळू उपसा होत असल्याचे दिसून आले, त्यावेळी आम आदमी पक्षाचे औरंगाबाद जिल्हा सहसंयोजक अॅड. शेख उस्मान ताहेर यांनी घटना स्थळी जाऊन पाहणी केली असता सबंधित सजेचे तलाठी इंगळे  यांना या संदर्भात विचारणा केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन आम्हाला काहीच माहित नाही म्हणून फोन कट केला त्यावेळी अॅड. उस्मान शेख यांनी सदर प्रकाराबाबत वरिष्ठ पातळीवर तक्रार देऊन प्रसिद्धी माध्यमांशी संपर्क करुन इंतभू संपुर्ण घटनाक्रम सांगितला,असता त्यांच्या तक्रारीचे प्रसार माध्यमांनी सदर वृत्त दि. 21 ऑगष्ट 2020 रोजी प्रसिद्धी माध्यमात बातमी प्रकाशित होताच सिल्लोडचे महसूल प्रशासन खडबडुन जागे झाले,व त्या वृत्तपञाच्या बातमीची दखल घेऊन मा. उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांनी व तहसीलदार रामेश्वर गोरे यांना संबंधित तलाठी इंगळे यांना कारणे दाखवा नोटीस जारी करून या प्रकरणी गुन्हा दाखल करणेकामी निर्देश दिल्यानंतर तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी दि. 21/08/2020 रोजी सजा तलाठी बोरगांव बाजार इंगळे यांना अवैध गौण खणीज म्हणजेच अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू तस्करा विरुद्ध तात्काळ पोलीस गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याचे पत्र देण्यात आले.

त्यामुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू तस्कराच्या गोटात  खळबळ  माजली आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here