तंबाखूमुक्त अभियान कार्यशाळा आमठाणा

0

सिल्लोड ( प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे ) दिनांक 02सप्टेंबर 2020
रोजी केंद्रीय प्राथमिक शाळा आमठाणा येथे केंद्रप्रमुख श्री कुंभारे सर यांच्या उपस्थितीत केंद्रातील सर्व शिक्षकांसाठी
COVID-19च्या संकटकाळी
आरोग्य,स्वछता,तंबाखूमुक्ती साठी “सलाम मुंबई फाऊंडेशन”आणि शिक्षण विभाग औरंगाबाद यांच्या सयुक्त पुढाकाराने सर्व शाळा तंबाखू मुक्त करण्यासाठी महत्वाची बैठक घेण्यात आली.
या बैठकीसाठी प्रमुख म्हणून जिल्हा समन्वयक माननीय “श्री सतिश वानखेडे साहेबांची उपस्थिती होती.
केंद्रप्रमुख श्री कुंभारे सर यांनी आजच्या बैठकीविषयी नमुद करतांना तंबाखू/गुटखा सेवन केल्यामुळे होणारे दुष्परिणामांविषयी खुपच मुद्देसूद महिती सादर केली.
तसेच श्री रऊफ सर यांनी मार्गदर्शन केले .
आजच्या कार्यक्रमाचे प्रमूख आकर्षण “श्री चव्हाण सर “यांनी
खुपच छान व सर्वांना समजेल अशा पध्दतीने PPT सह सादरीकरण केले.
त्यामध्ये त्यांनी कोविड-19,आरोग्य,स्वच्छता,तंबाखूमुक्त शाळा यावर प्रकाश टाकला.तसेच आपण सर्वांसाठी तंबाखूमुक्त शाळा ही माहिती भरतांना उपयोगी पडतील असे 11निकष थोडक्यात,
1)शालेय परिसरात मू.अ.,शिक्षक, विद्यार्थी,सर्व कर्मचारी यांना तंबाखुजन्य पदार्थ खाण्यास बंदी आहे.
2)शाळेत तंबाखूमुक्त नियंत्रण समिती स्थापना व त्रेमासिक बैठका आयोजित करणे.
3)शालेय परिसरात धुम्रपान करणे,तंबाखू/गुटखा खाणे गुन्हा आहे.
4)तंबाखूचे दुष्परिणाम व नियंत्रण कायदा याची सर्वसामान्यांना व्हावी म्हणून पोस्टर्स लावणे.
5)तंबाखू विरोधी संदेश विद्यार्थ्यांच्या वहीवर लिहिणे.
6)प्रत्येक शाळेत या विषयासंबंधीत शासननिर्णय परीपत्रक असणे आवश्यक आहे
7)तंबाखू नियंत्रण सल्लागार समिती आरोग्य,दवाखाना ई.नी
शाळेसाठी पत्र लिहून मदत घेणे.
8)आरोग्यसेवा कर्मचारी यांनी शाळेत येऊन उद्बोधन केले पाहिजे.
9)शाळेत 100मीटर परिसरात तंबाखूमुक्त परिसर असल्यामुळे
येथे तंबाखू,गुटखा ,सिगारेट विक्री बंदी आहे.
10)मुख्याध्यापक यांनी आपल्या शाळेतील सर्व शिक्षक ,विद्यार्थी यांचा सहभाग घेऊन आणि शिक्षक,विद्यार्थी
यांचा सत्कार करावा.
11)अशा प्रकारे वरील सर्व 10निकष पूर्ण केल्यावर शाळेच्या मुख्य ठिकाणी “तंबाखूमुक्त शाळा “असा फलक लावावा.
अश्याप्रकारे चव्हाण सर यांनी खूपच छान मार्गदर्शन केले .
यावर आदरणीय श्री वानखडे सर पेंडगाव यांनी “बाळया येड्या रे नाम्या,खाऊ नको तंबाखू गुटखा या गीताद्वारे सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
सलाम मुंबई फाऊंडेशन (जिल्हा समन्वयक) माननीय सतिशजी वानखेडे सर यांनी सर्वांचे भरभरुन कौतुक केले, तसेच सर्वांच्या शंकांचे निरसन करून आपल्या आमठाणा केंद्राचे सर्व मागील वर्षीचे रिपोर्ट उपलब्ध करुन देण्याचेआश्वान दिले.
म्हणून आमठाणा केंद्रातर्फे साहेबांचे खूप खूप आभार व धन्यवाद!!!
याप्रसंगी केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते.
शेवटी केंद्रप्रमुख साहेबांच्या संमतीने श्री अब्दुल कादिर सर यांनी सांगता केली 🙏🙏🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here