एक वर्षापुर्वी पडलेल्या शाळा खोल्याविषयी संबधीत विभागाकडुन कोणत्याच प्रकारची हलचाल होत नाही

0

सिल्लोड ( प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे ) बोरगांव बाजार ता.सिल्लोड येथील  जिल्हा परिषद शाळेची मागील वर्षी दिनांक 11/09/2019 रोजी राञी जोरादार पाऊस पडल्यामुळे,एका शाळा खोली (छत) पञासह भिती पडल्या होत्या,व याप्रकरणी संबधीत शिक्षण विभागाकडे फोटोसहीत लेखी पंचनामा प्रत देऊन सुध्दा,या प्रकरणाकडे संबधीत विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे ,पालकातुन संताप व्यक्त करण्यात येत आहे, बोरगांव बाजार ता.सिल्लोड येथील  जिल्हा परिषद शाळेची शाळाखोली मागील वर्षी दिनांक 11/9/2019 रोजी राञी जास्त पाऊस पडलेल्यामुळे एक शाळाखोली (छता)पञा व भितीसह पडली होती, व या प्रकरणी 12/09/2019 रोजी शालेय समिती पदाधिकारी व मुख्यध्यापक यांनी सदरील पाऊसामुळे पडलेल्या शाळेच्या ढाच्याचा(ढिगाऱ्याचा) पंचनामा करुन तो फोटोसह गटशिक्षण आधिकारी सिल्लोड यांना  देऊन तात्काळ दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती,परंंतु या एक वर्षापुर्वी पडलेल्या शाळा खोल्याविषयी संबधीत विभागाकडुन कोणत्याच प्रकारची हलचाल होत नाही व या संबधीत शिक्षण विभागाला काही सोईरसुतक दिसत नाही,कारण नवीन शाळा खोलीचे काम यावर्षी होईल का नाही,अशी भिती पालकांत निर्माण झाली आहे, याचे कारण असे कि य़ेथे अगोदरच शाळेत वर्ग खोल्या कमी व  विद्यार्थ्या संख्या जास्त असल्यामुळे (दुष्काळात तेरावा महीना) आपल्या पाल्याला या आधिकारी व लोकप्रतिनीधीच्या वेळकाडु  धोरणामुळे विद्यार्थ्याना पाऊस,थंडी,उन्हात व उघड्यायावर बसुन ज्ञानार्जन करावे लागते कि काय असा प्रश्न पालकांना पडला (भेडसावत)आहे,यामुळे विद्यार्थ्याचे माञ यावर्षी शैक्षणिक नुकसान होणार आहे,वर्ग खोल्या कमी असल्यामुळे एकतर विद्यार्थ्याना उघड्यावर वऱ्हाट्यात किवा दोन वर्गाचे मुलाना एकञ बसवुन शिक्षकांना शिक्षण द्यावे लागणार आहे,

तरी संबधीत जिल्हापरिषदमधील वरिष्ठआधिकाऱ्यासह,  गटशिक्षण आधिकारी सिल्लोड यांनी या महत्वाच्या प्रश्नावर लक्ष देऊन हा गंभीर विषय हाथाळावा व नवीन शाळा खोल्यासाठी निधी उभारुन देण्यास मदत करावी अशी मागणी पालकांतुन होत आहे…बोरगांव बाजार येथील जि.प.शाळेतील शाळाखोली पडल्याप्रकरणी आम्ही जि.प.शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी सिल्लोड यांना वेळोवेळी लेखी तोडी अर्ज देऊन व पडलेल्या शाळाखोलीस निधी उपलब्ध करुन द्यावी,अशी मागणी केली परंतु संबधीताकडुन हा विषयी गंभीर्याने घेण्यात येत नाही,यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार आहे,व याला संबधीत विभागच पुर्ण जबाबदार राहील.

(सलीमशाहा जि.प.शालेय समितीअध्यक्ष)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here