
सिल्लोड ( प्रतिनिधी-विनोद हिंगमीरे ) दिनांक:-२६ ऑगस्ट २०२० छत्रपति शाहू महाराज कृषि महाविद्यालय कांचनवाडी औरंगाबाद येथिल कृषिदुत काजल जैस्वाल यान्नी खंडाळा येथे कार्यानुभ कर्यक्रमात शेतकऱ्यांना एकात्मिक गवत व्यवस्थापन यावर माहिती दिली.
कृषिविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.के. शेलके तसेच कृषिविस्तार विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका प्रनिता मुळे आणि ऍग्रोनॉमी विभागाच्या प्राध्यापिका रोहिणी उंबरकर यांच्या मार्गदर्शनात खंडाळा गावात शेतकऱ्यांना माहिती दिली.
गावची लोकसंख्या ३-४ हजार असुन येथे कोरडवाहू क्षेत्र जास्त आहे आणि येथे गवताची समस्या खुप गंभीर आहे म्हणून काजल जैस्वाल यांनी योग्य प्रकारे कमीत कमी खर्चात गवताचे व्यवस्थापन कसे करावे यावर सविस्तर माहिती संगितली
