केळगाव येथे श्री महालक्ष्मी ची घरोघरी उत्साहात स्थापना :- जेष्ठा कनिष्टा गौरींचे करण्यात आले पुजन , देशावर आलेले कोरोनाचे संकट लवकर जावु दे – महालक्ष्मीला साकडे

0

सिल्लोड ( प्रतीनिधी :-विनोद हिंगमीरे ) केळगाव मांगल्याचे प्रतीक धनधान्यास बळकटी व ईच्छीत मनोकामना पुर्ण करणार्या गौराईंची स्थापना मंगळवार रोजी सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथे मोठ्या भक्तीभावाने व मंगलमय वातावरणात करण्यात आली असून बुधवार रोजी मोठ्या उत्साहात जेष्ठा कनिष्ठा गौराईंची महापुजा करण्यात आली.
यावेळी मंगळवार रोजी सकाळपासूनच सर्वाच्या घरोघरी श्रीमहालक्ष्मीच्या आवाहनाची लगबग सुरू होती. श्रीमहालक्ष्मीसाठी आणलेल्या मखराला विविधरंगी आकर्षक डिझाईन असलेले पडदे घालुन सजवण्यात येत होते. त्यावर तोरणे हंड्या झुंबर रंगीबेरंगी लाईट लावुन आकर्षक सजावट करण्यात सर्वच दंग झाले होते विषेश म्हणजे . यावर्षी कोरोणा संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने व पर्यावरणाला बाधा पोहचणार नाही अशी पर्यावरणपुरक सजावट करण्यात आली होती.
सायंकाळी सुवासिनींनी नवुवारी साडी नेसून तुळशी व्रुंदावनापासुन सोनपावलाने येणार्या जेष्टा कनिष्ठा गौराईला आनंदमय वातावरणात अनुराधा नक्षत्रावर स्थापना करण्यात आली.यावेळी सणयीचा सुर मंगलवाद्ये यामुळे वातावरण प्रसन्न झाले होते.
बुधवार रोजी ब्रम्हव्रदांच्या मंत्रोच्चारामध्ये येथील प्रभाकार काथार , ज्ञानेक्ष्वर काथार ,बाळु काथार ,विनोद हिंगमीरे ,स्वप्नील मोरे यजमान बंधुंनी आपआपल्या घरोघरी सपत्निक श्रीमहालक्ष्मींची महापुजा केली व सामुहीक आरती करून सोळा प्रकारच्या भाज्या कोशींबिर पंचाअर्म्रुत खिर पुरणपोळी असे विविध पदार्थ बनवुन देविला नैवेद्य दाखविला. व सर्वानी गौरी गणपती जवळ साष्टांग दंडवत घालुन देशावर ओढावलेल्या कोरोणा संकटातून सर्वांना सुखरूप ठेव व या महामारीतुन सर्वाची लवकर सुटका करून पुन्हा पुर्वी सारखे दिवस येऊ दे असे साकडे देविला यावेळी घालण्यात आले.
तीन दिवस माहेरवाशीन म्हणून आलेल्या जेष्टा कनिष्ठा गौरींईच्या आगमनामुळे सर्व घराघरांमध्ये पवित्र अन आनंददाई वातावरण बघायला मिळत होते. या उत्सवानिमित्त बाहेरगावी गेलेले घरातील कुटुंब या उत्सवामुळे एकत्र आले होते त्यामुळे वातावरण अधिकच द्रुढ झाल्याचे दिसुन आले सायंकाळी दर्शनासाठी आलेल्या महिला भगिनींनी श्रीमहालक्ष्मीच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले. व हळदीकुंकु वाहुन आशिर्वाद घेतले. अशा या अनुराधा नक्षत्रावर आगमन झालेल्या महालक्ष्मी जेष्टा कनिष्ठा गौरींचे बाळमुर्तीसह तीसर्या दिवशी म्हणजेच गुरुवार रोजी पुजा आरती व गोड पुरण पोळीचा नैवेद्य दाखवण्यात येऊन.सायंकाळी साक्षात लक्ष्मीचे रूप असलेल्या श्रीमहालक्ष्मींना भावपुर्ण वातावरणात जड अंतकरणाने निरोप देण्यात येणार आहे व पुढील वर्षी लवकर या अशी याचना करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here