मनमाड शहरातील रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती आणि मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा

0

मनमाड – शहरातील रहिवासी श्री अनिल रंगनाथ मिसर यांच्या वाहनाला स्मशानभूमी जवळील रस्त्यावर असलेले खड्डे चुकवितांना एका मोकाट जनावराने धडक दिल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झालेला आहे, अश्या प्रकारे ही काही पहिलीच घटना नाही ,या अगोदर रस्त्यावरील खड्डे तसेच मोकाट जनावरांमुळे अनेक लोक जखमी झाले असून काही लोकांचा मृत्यूदेखील झालेला आहे, तरीही मनमाड शहरात रस्त्याची दुरुस्ती केली जात नाही तसेच रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावराचा आज पाहतो कुठलाही बंदोबस्त केलेला नाही ,वरील कारणामुळे यापुढे कुणालाही आपला जीव गमवावा लागू नये आणि त्यामुळे एखाद्याचा संसार उध्वस्त होऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने योग्य तो निर्णय घेण्यात यावा वरील मागणी पूर्ण होणार नसेल तर आम्हाला अमर उपोषणाला बसावे लागेल तरी आपल्याकडून मनमाडच्या जनतेला योग्य न्याय मिळेल अशा आशयाचे निवेदन देण्यात आले ,या निवेदनावर श्री अजय खरोटे,राजाभाऊ तिवारी, राजाभाऊ करकाळे, संदीप पाटील, दशरथ शिंदे, निखिल पगार ,योगेश मिसर आदींच्या सह्या आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here