अवैध वाळू माफिया च्या विरोधात महसूल विभागाची कारवाई

0

सिल्लोड ( प्रतिनिधि विनोद हिंगमीरे ) सिल्लोड तालुक्यातील अवैध वाळू माफिया यांचे विरुद्ध कारवाई करिता महसूल विभागाने पथक निर्माण केले आहे. सदरील पथक मा. उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील व तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील पथक उंडणगाव शिवारात गस्त घालत असताना सायंकाळ दरम्यान . कैलास लक्ष्मण पाडवे रा.उंडणगाव यांचे ट्रॅक्टर क्र एम एच 20 सी आर 6290 मध्ये मुरूम वाहतूक करतांना आढळून आले असता सदरील वाहनांमध्ये 1 ब्रास मुरूम आढळून आला आहे. संबंधिता कडे कोणताही परवाना नसल्याने ट्रकटर जप्त करण्यात आले आहे.सदरील वाहन जप्त करून तहसील कार्यालय सिल्लोड येथे जमा करण्यात आले आहे . संबंधीत यांचेविरुद्ध एक ब्रास साठी रक्कम रु 106400 /- रुपये ( अक्षरी- एक लाख सहा हजार चारशे रु मात्र) ची दंडात्मक कार्यवाही प्रस्तावित केलेली आहे. सदर कार्यवाही पथक प्रमुख . एस डी सोनवणे नायब तहसीलदार , ससाणे मंडळ अधिकारी, निर्वाण व इतर यांनी सदर कार्यवाही पूर्ण केली . तसेच येणा-या काळात सुद्धा अवैध गौणखनिज वाहतूक करणा-या विरुद्ध अचानक धाडी टाकून अवैध गौणखनिज वाहतूक करणा-यांची वाहने जप्त करून दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल असे रामेश्वर गोरे तहसीलदार व ब्रिजेश पाटील उपविभागीय अधिकारी यांनी इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here