उपचारा साठी सोसावा लागतो अर्थिक भुदंड,

0

सिल्लोड ( प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे )बोरगांव बाजार येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात सद्या कार्यरत असलेले डाँक्टर मागील अनेक वर्षापासुन सरकारी क्वार्टर(मुख्यालया)मध्ये राहत नसल्याने व महीन्यात लसीकरणाला धावती भेट देतात,व या आरोग्य केद्राचा कारभार चालतो आशासेविकेच्या भरवशावर,य़ामुळे होतात गरीब गरजु रुग्णांनाचे हाल, उपचारा साठी सोसावा लागतो अर्थिक भुदंड,

शासनाने गरिब,गरजु नागरीकांना वेळेवर व मोफत,दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी या उध्देशाने लाखोरुपये खर्च करुन सर्व सोईयुक्त आरोग्य उपकेद्रांच्या मोठमोठ्या इमारतीचे(दवाखाने) बांधकाम करुन यामध्ये डाँक्टर ,सोनोग्राफी ,रुग्ण तपासणी रुमसह,क्वार्टर,यासारख्या सर्व आधुनिक सुख-सोई आसताना सुध्दा काही कर्तव्यकसूर कर्मचारी यामध्ये राहणे पसंत करत नाही, व आपल्या मर्जीनुसार वागत आसतात अासच उदाहरण बोरगांव बाजार व बोरगांव सारवाणी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रा बाबत आहे,बोरगाव बाजारची लोकसंख्या साधारण चार साडेचार हजारावर आहे व परिसरातील कोटनांद्रा,सावखेडा बु,खु,सोनाप्पावाडी,बोरगांव सारवाणी,खातखेडा, डोईफोडा आदी गावाना मुख्यबाजार पेठेचे गाव असुन बाहेर गावातील महीला,नागरिकांना काही उदा-शाळा,काँलेज,दवाखाना,शेतीचे बी बियाने,खते-किटकनाशके,बँक आदी कामे करण्यासाठी बोरगाव येथे यावे लागते यामुळे गावात नेहमीच वर्दळ असते,व गावातील बहूताशं ७५ टक्के लोक मोलमंजुरी,शेती करुन आपला संसाराचा गाडा चालवत असतात,व वरिल सर्व गावामध्ये दिवस-राञ आरोग्य सेवा प्रदान करणारे खाजगी-सरकारी डाँक्टर,कर्मचारी राञीच्या वेळी उपलब्ध राहत नसल्यामुळे राञी-अपराञी अचानक एखाद्या नागरिकांची तब्बेत बिघडली तर बरेच वेळा प्राथमिक उपचार सुध्दा मिळत नाही,अशा वेळी त्यांना खाजगीवाहन करुन तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणा जाऊन महागडा उपचार घ्यावा लागतो व अनेक वेळा गावामध्ये साथीचे आजार,लहान मुलाना वेळेवर लसीकरण,सर्दी ताप,महीलांच्या समस्या अशा अनेक आजारावर गरिब कष्टकरी (रुग्णांना) नागरिकांना मोफत उपचार व्हावा याअनुषंगाने  शासनाने (आरोग्य केद्रं)सरकारी दवाखान्याच्या इमारतीवर लाखो रुपये खर्च करुन,त्यात डाँक्टरासाठी क्वार्टर,गलगठ्ठ पगार देऊन व डाँक्टर,नर्स यांनी कायमस्वरुपी मुख्यालयी राहवे व तसे बधंनकारक आसतानासुध्दा बोरगांव बाजार येथे नेमणुक असलेल्या डाँक्टर या मुख्यालयी न थांबता आपल्या सोईच्या ठिकाणावरुन महीन्यात केव्हा तरी आपल्या सोईनुसार आरोग्य केंद्रावर धावती भेट देतात व निघुन जातात,व आपला सर्व कारभार हा आशासेविकांच्या भरवशावर करतात,व सर्व शासकिय कर्मचा-यांना मुख्यालयाला राहणे बंधनकारक आसताना सुध्दा बोरगांव बाजार येथील आरोग्य केद्रांवर कार्यरत डाँक्टर,नर्स हे शासनाच्या ठरवुन दिलेल्या मुख्यालयी राहणे बंधनकारक या नियमाला व कोणत्या वरिष्ठ अाधिकारी किवा स्थानिक लोकप्रतिनीधीना न जुमानता आपल्या मर्जीने वागतात व शासनाच्या नियमांनी केराची टोपली दाखवतात.

तरी जिल्हा व तालुकास्तरावरिल वरिष्ठ आरोग्य आधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधीनी या प्रकरणाकडे जातीने लक्ष देऊन संबधी कर्मचारी यांना मुख्यालयी राहुन आपली जबाबदारी काय आहे यांची जाणीव करुन द्यावी व गरिब गरजु नागरीकांचे होणारे हाल थांबवावे अशी मागणी गावक-यांतुन होत आहे.बोरगांव बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक महीन्यापासुन डाँक्टर राहत नसल्यामुळे अनेक दिवसापासुव आरोग्य केंद्र असेच धुळखात बंद आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here