सिल्लोड शहरात श्रीगणेशोत्सव व मोहरमच्या पार्श्वभूमीवर पोलीसांचे पथसंचलन

0

सिल्लोड  ( प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे ) सध्या संपूर्ण जगभरात कोरोनाव्हायरस या संसर्गजन्य आजाराने थैमान घातलेले असून कोरोणा व्हायरसचा प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने शासनस्तरावर विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.परंतु कोरणा संसर्गजन्य रोगाने शहर व ग्रामीण भागामध्ये शिरकाव करण्यास सुरुवात केलेली आहे.
कोरोणाला आळा घालण्यासाठी प्रशासनाच्या वतीने मागील चार महिन्यापासून पुढील काही काळासाठी गर्दी होणारे सर्वच सामाजिक,राजकीय,धार्मिक कार्यक्रमावर बंदी घालण्यात आलेली आहे.श्रीगणेशोत्सव व मोहरम या सणाच्या पार्श्वभूमीवर सिल्लोड शहरात उपविभागीय पोलिस अधिकारी श्री सुदर्शन मुंडे व सिल्लोड शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री राजेंद्र बोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिल्लोड शहर पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी तोंडाला मास्क लावुन सोशल डिस्टंसींगचे पालन करून शहरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक,प्रियदर्शनी चौक,अल्लामा चौक,शिवाजी महाराज पुतळा,जामा मस्जीद(मर्कज) या सह आदी भागात पथसंचलन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here