धार्मिकतेतून कोरोना जनजागृतीचा प्रयत्न महालक्ष्मीला महाकोरोना घालवण्याचे साकडे

0

सिल्लोड ( प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे) हिंदू स संस्कृती मधे अनेक धार्मिक रूढी परंपरा आहेत. या परंपरा विषयी समाज मनात अपार श्रद्धा आहे. त्यापैकीच एक गौरी गणपतीलाही अतिशय महत्व आहे. तीन दिवसासाठी येणाऱ्या या जेष्ठा गौरीचे दरवर्षी मनोभावे पूजन करून इतर धार्मिक विधी करण्याची पदधत आहे. यावर्षी कोव्हीड – १९ संसर्गाने सर्वच कार्यक्रमांवर मर्यादा आल्या आहेत. परंपरा न टाळून सुद्धा शासन नियमावली रूढ होत आहे. आणी यात आरोग्य, सरंक्षण खात्याशी निगडित असलेल्या प्रशासकिय सेवा देणाऱ्या यंत्रणा देवासमान मानल्या जाऊ लागल्या. त्याचाच एक भाग म्हणून किंवा त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी तळणी ता.सिल्लोड येथील श्रुति अशोक गरुड या बारावित शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने सामाजिक भान जपत महालक्ष्मी सणासाठी सुंदर देखावा तयार केला आहे. स्वच्यता, मास्क , आरोग्यसेवा बाबत यातुन संदेश देण्यात आला आहे. घरी राहून सूरक्षा राहा ,असा जनजागृती करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तीचे येथे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here