स्वराज्य युवा संघटनेच्या वतीने सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. राजेंद्र बोकडे यांचा सत्कार

0

सिल्लोड ( प्रतिनिधी- विनोद हिंगमीरे ) सिल्लोड शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांना नुकताच केंद्रीय गृह मंत्रालय यांच्याकडून विषेश पदक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानिमीत्ताने स्वराज्य युवा संघटना सिल्लोड यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला आहे . कोरोना कोव्हीड च्या काळात हे कोरोना चे संकट हरवण्यासाठी श्री.बोकडे हे अतिशय उत्तमची कामगिरी शहरातमध्ये बजावत आहे.त्यामुळे त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या या पुरस्काराचे सिल्लोड शहर तसेच ग्रामीण भागातून सर्वच स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे. यावेळी स्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल भाऊ आवटे औरंगाबाद जिल्हा सचिव शहानवाज खाॅन सर, उपाध्यक्ष शंकर मानकर पाटील, शहर उपाध्यक्ष संदिप ढोरमारे यांनी त्यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here