पोहेकाॅ श्री विठ्ठल चव्हाण व पोलीस नाईक श्री संदीप कोथलकर यांचा कोरोणा योद्धा म्हणुन सन्मान

0

सिल्लोड ( प्रतिनिधी -विनोद हिंगमीरे ) सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील पोहेकाॅ भराडी बिट जमादार श्री विठ्ठल चव्हाण तसेच पोलीस नाईक श्री संदीप कोथलकर यांनी कोरोणाच्या पार्श्वभुमीवर मार्च ते ऑगस्ट या कालावधीत भराडी व भराडी बीट अंतर्गत येणा-या गावांमधील पंचायत समिती सदस्य, सरपंच,उपसरपंच,पोलीस पाटील,कोरोणा नियंत्रण कमिटी,ग्रामसुरक्षा दल,डाँक्टर,अंगणवाडी सेविका,आशा सेविका यांच्या सोबत राहुन कोरोणाचा गावात शिरकाव होऊ नये यासाठी योग्य नियोजन करून भराडी हे गाव मोठ्या लोकसंख्येचे गाव असुनही भराडी व भराडी बिट अंतर्गत काही गावात तुरळक प्रमाणात कोरोणा रूग्ण आढळून आलेले आहेत.श्री विठ्ठल चव्हाण व श्री संदिप कोथलकर यांनी कोरोणा काळात आपले कर्तव्य आजपर्यंत जबाबदारीने पार पाडल्याबद्दल त्यांचा भराडी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने कोरोणा योद्धा म्हणुन शाल,श्रीफळ व सन्मानञ देऊन गौरव करण्यात आला.यावेळी पंचायत समीती उपसभापती काकासाहेब राकडे,सरपंच शारदाताई महाजन,उपसरपंच अनिसखाॅ पठाण,ग्रामपंचायत सदस्य गजानन महाजन,तलाठी आरती माने, ग्रामविकास अधिकारी अशोक दौड,पोलीस पाटील यमुनाबाई काकासाहेब राकडे,नारायण खोमणे,कोंडीबा पांडव यांच्यासह आदी ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here