100 वर्षाच्या आजोबांनी केली कोरोनावर मात गावकऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात केले गावांत स्वागत

0

सिल्लोड ( प्रतिनिधी-विनोद हिंगमीरे ) सिल्लोड तालुक्यातील तळणी येथील भिकन राव आनंदराव गरुड यांची वयाचे शतक पार केलेल्या आजोबांनी या आजारावर यशस्वीपणे 10 दिवसाच्या उपचारांनंतर मात केली सद्या ग्रामीण भागात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे मात्र सद्या मृत्यु चे प्रमाण कमी झाले आहे तळणी येथे अगोदर एक पॉझिटिव्ह रूग्ण सापडल्या मूळे गावांत प्रशासनाच्या वतीने तपासणी कँप ठेवण्यात आला या कँप मध्ये 367 व्यक्तीची रॅपिड टेस्ट करण्यात आली यामध्ये 10 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत यामध्ये एका 100 वर्षाच्या आजोबांना सुध्दा लागण झाली होती त्यावर सिल्लोड येथे उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते डॉक्टर च्या यशस्वी उपचारांनंतर 10 दिवसानी आजोबांनी आपल्या प्रबळ इच्छाशक्ती च्या जोरावर कोरोनावर मात केली डिस्चार्ज मिळाल्या नंतर दवाखान्यात आजोबांचे स्वागत करण्यात आले तसेच गावात परतल्यानंतर गावकऱ्यांनी सुध्दा टाळ्या वाजवून सत्कार करण्यात आला गावातील 9 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातुन घरी परतले व 2 रुग्णांवर उपचार सुरू आहेत यावेळी माजी सभापती अशोक गरुड, सरपंच गजानन वाघ, संतोष सोनवणे,कैलास गरूड,सागर राजपूत,नंदू गरुड व गावकऱ्यांची उपस्थिती होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here