भारतीय स्वतंत्र्यदिनानिमित्त कोविड समस्या या विषयावर ऑनलाईन चर्चा सत्राचे आयोजन

0

मनमाड – ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे भारतीय स्वतंत्र्यदिनानिमित्त कोविड समस्या या विषयावर ऑनलाईन चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते.याचर्चासत्रात मनमाड शहरातील कोविड रुग्ण व कुटुंबातील सदस्यांना निर्माण होणा-या समस्या यावर प्रामुख्याने चर्चा झाली.या चर्चा सत्रामध्ये आयु.सतिषभाउ केदारे(अति.झोनल सचिव), प्रविण आहीरे,(सचिव कारखाना शाखा), सिद्धार्थ जोगदंड (कार्याध्यक्ष कारखाना शाखा), अर्जुन बागुल, कल्याण धिवर, किरण वाघ,शरद झोबाड, हर्षद सुर्यवंशी आदी ने सहभाग घेतला.तर या ऑनलाइन चर्चा सत्रामध्ये संदिप धिवर (सचिव, ज्युनिअर इन्स्टिट्युट मनमाड), यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. सागर गरुड (उपाध्यक्ष कारखाना शाखा) व सुभाष जगताप (उपाध्यक्ष कारखाना शाखा यांनी ऑनलाईन मिंटीगचे आयोजन केले.यावेळी कारखाना कोविड वॉरियर्स ग्रुप हा व्हाट्स व्हाट्सअप वर तयार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here