रोटरी क्लब मनमाड यांच्या कडून विसापूर येथे वृक्षारोपण संपन्न

0

मनमाड : 74 व्या भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्त नेहेमी सामाजिक कार्यात अग्रगण्य असणाऱ्या रोटरी क्लब मनमाड यांच्या कडून विसापूर येथील जिल्हा परिषद शाळेत वृक्ष रोपण संपन्न झाले. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या सौजन्याने प्रबंधक श्री हर्षवर्धन जी गुप्ता यांनी विसापूर येथील जिल्हा परिषद शाळेस ट्री गार्ड उपलब्ध करून दिले. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दिनी शाळेच्या प्रांगणात कडुनिंब आणि गुलमोहर या भारतीय जातींच्या झाडांचे ट्री गार्ड सह रोटरी क्लब आणि विसापूर ग्रामस्थांन द्वारे वृक्ष रोपन करण्यात आले.या कार्यक्रमास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नांदगाव तालुका प्रचार प्रमुख श्री योगेश म्हस्के आणि मनमाड मधील सामाजिक कार्यकर्ते श्री अनिरुद्ध तोंडे हे उपस्थित होते.रोटरी क्लबचे चे अध्यक्ष श्री लवकुमार माने आणि सचिव श्री आंनद काकडे यांच्या कडून रोटरी क्लबच्या कार्याची आणि नियोजित कार्यक्रमाची माहिती करून देण्यात आली.प्रोजेक्ट चेअरमन डॉ. श्री सुमित शर्मा , स्वप्नील सुर्यवंशी तसेच रोटरी क्लबचे ज्येष्ठ सदस्य श्री सुभाष गुजराथी सर , श्री गुरुजीत सिंह कांत , श्री अनिल दादा काकडे , श्री देवराम सदगीर , श्री आंनद लोढा उपस्थित होते. विसापूर ग्रामस्थांच्या वतीने या वेळेस उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. सरपंच श्री कचरू भाऊ बोळीज , माजी सरपंच श्री विलास ढोमसे , शाळा कमिटी अध्यक्ष श्री अरुण कदम , मुख्याध्यापक श्री श्रावण ठाकरे सर व शाळेतील सर्व शिक्षक आणि विसापूर ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री अनिल सिनकर सर यांच्या कडून करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here