पदोन्नतीचे आरक्षण मिळालेच पाहिजे म्हणून धरणे आंदोलन करणार

0

मित्रहो,

आपल्या सर्वांसाठी मी एक निवेदन करत आहे. आपण उद्या कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतिने *पदोन्नतीचे आरक्षण मिळालेच पाहिजे म्हणून धरणे आंदोलन करणार आहोत.*
मात्र या आंदोलनाचे स्वरुप थोडे वेगळे असणार आहे. नेहमी प्रमाणे आपण सर्व जण जिल्हाधिकारी कार्यलयासमोर बसून धरणे धरणार नाही.त्याचे कारणही आपल्या सर्वांना माहीत आहे. राज्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.
अशा परिस्थितीत आपण *सोशल माध्यमांचा ( whatsapp, फेसबुक, tuter, intragram इ.) वापर करून धरणे आंदोलन करणार आहोत.*
प्रत्येक जण आपल्या हातात *पदोन्नतीचे आरक्षण मिळालेच पाहिजे* अशा स्वरूपाचे बँनर घेऊन ते सोशल माध्यमांवर पोस्ट करतील. या प्रकारच्या आंदोलनाचा एक मोठा फायदा म्हणजे सर्व जण यात सहभागी होऊ शकणार आहेत. आज पर्यंत काही मोजकेच लोक आंदोलनात सहभागी व्हायचे, बाकीचे म्हणायचे आमचा पाठिंबा आहे आणि काही तरी कारण सांगून घरी बसायचे.आता या घरी बसणार्यां मंडळींना आंदोलनात सहभागी होता येईल. त्यांनी एका *साध्या पांढरा कागदावर पदोन्नतीचे आरक्षण मिळालेच पाहिजे.* असे लिहून आपल्या हातात हा कागदी बँनर घेऊन फोटो काढून तो फोटो सोशल माध्यमांवर पोस्ट करायचा आहे.
आता या मध्ये अजूनही एक गंमत आहे आपले काही बांधव स्वत: मागासवर्गीय म्हणून व्यक्त होत नाहीत.मात्र सवलती हक्काने घेतात त्यांना तुम्ही प्रकाशात आणावे. तुम्ही जरी त्यांंच्या सोबत सेल्फी काढून टाकली तरी चालेल.ही सुद्दा फार मोठी चळवळ आहे. विचार करा आज पदोन्नतीचे आरक्षण मिळत नाही उद्या सरळ सेवेतील आरक्षण मिळाले नाही तर—-
यासाठी आरक्षणाचा फायदा घेऊन सेवेत आहेत त्यांनी सर्वानी आंदोलनाचा एक भाग असणे गरजेचे आहे.
या आंदोलनामुळे मागासवर्गीय कर्मचारी जागृत किती आहे हे समजणार आहे.
मला खात्री आहे की सर्व मागासवर्गीय कर्मचारी जागृत झाले तर *पदोन्नतीचे आरक्षण मिळाणारच*
मात्र आपले आंदोलन सर्वांपर्यंत पोहचवा.
धन्यवाद!
आपला नम्र,
*आकाश तांबे*
सरचिटणीस
*कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here