संस्कृती संवर्धन समितीचा रोप्य महोत्सव यावर्षी विविध उपक्रमांद्वारे साजरा

0

मनमाड :  ( प्रतिनिधी रेवती गद्रे )  संस्कृती संवर्धन समितीचा रोप्य महोत्सव यावर्षी विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्याचा मनोदय समिती द्वारे व्यक्त करण्यात आला . सतीश न्ह्यायदे यांच्या नेतृत्वाखाली आगामी वर्षाची कार्यकारिणी जाहीर करण्यात येऊन संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या लोगोचे  प्रकाशन करण्यात आले.
गेल्या 24 वर्षांपासून विवेकानंद व्याख्यानमालेचे आयोजन करणारी संस्कृती संवर्धन समिती आपल्या रौप्य महोत्सवी वर्षाची सुरुवात 9 ऑगस्ट पासून करण्याचे ठरविले आहे.  क्रांती दिन ते स्वातंत्र्य दिन या कालावधीमध्ये हे पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांकरिता वेशभूषा स्पर्धा व पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा दोन गटात गीत गायन स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत.                          संस्कृती संवर्धन समितीच्या किशोर नावरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रौप्यमहोत्सवी वर्षासाठी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अध्यक्ष म्हणून सतीश न्ह्यायदे, सचिव पदी, डॉ. भागवत दराडे,  अर्थ सचिव म्हणून योगेश सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली. पदभार स्वीकारल्यानंतर अध्यक्ष किशोर न्ह्यायदे  यांनी वर्षभरातील कार्यक्रमांचा सूतोवाच केला. याप्रसंगी प्रवीण व्यवहारे व सतीश न्ह्यायदे यांनी संस्थेच्या रोप्यमहोत्सवी वर्षाच्या लोगोचे प्रकाशन केले.                                 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमाकांत मंत्री यांनी केले, सिद्धांत लोढा, रत्नाकर घोंगडे, व प्रवीण व्यवहारे यांनी नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here