
मनमाड ( प्रतिनिधी :रेवती गद्रे ) मनमाड शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक परंपरेमध्ये मानाचे स्थान असणार्या आणि शतकोत्तर वाटचाल करणार्या मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक यांची 100 वी पुण्यतिथी तर लोकशाहीर स्व.अण्णाभाऊ साठे यांची 100 व्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सुमारे एक लाख 50 हजार रुपयांची स्पर्धापरीक्षांची पुस्तके विद्यार्थ्यांसाठी खुली करण्यात आली.
महाराष्ट्र शासनाकडून मानवविकास कार्यक्रमाअंतर्गत सन 2019-2020 मधील निधीमधुन मनमाड सार्वजनिक वाचनालयास प्राप्त झालेली स्पर्धा परीक्षांची 51 प्रकारची सुमारे 1 लाख 50 हजार रुपये किंमतीची 520 पुस्तके या दोन महान राष्ट्रपुरुषांच्या पुण्यतिथी व जयंती निमित्त विद्यार्थ्यां साठि खुली करण्यात आली.
या स्पर्धा परीक्षांच्या ग्रंथसंपदेत एम.पी.एस.सी., यु.पी.एस.सी. या व इतर स्पर्धा परीक्षांना उपयुक्त असलेले, एम.मी.एस.सी., यु.पी.एस.सी.प्लॅनर, पोलीस कॉन्स्टेबल भरती प्रक्रिया, महापरीक्षा पोर्टल, अशि 51 प्रकारची पुस्तके विद्यार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध करुन दिली जाणार आहे. या पुस्तकांचा वापर विद्यार्थी मनमाड सार्वजनिक वाचनालयामध्ये येवून अभ्यास करण्यासाठी करु शकतात. लॉकडाऊन उघडल्यानंतर या पुस्तकांचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन वाचनालयातर्फे करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे संयोजन अध्यक्ष नितीन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा सर्व संचालक मंडळाने केले.
या कार्यक्रमास मनमाड सार्वजनिक वाचनालयाचे संचालक नरेश गुजराथी, प्रदीप गुजराथी किशोर नावरकर, रमाकांत मंत्री, हर्षद गद्रे, अक्षय सानप,ग्रंथपाल संध्या गुजराथी नंदिनी फुलभाटी आदी मान्यवर हजर होते.
