श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलनात मनमाड शहराचे योगदान. कारसेवेत शहरातील एकाच परिवाराच्या दोन महिलांचा सहभाग

0

श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलनात मनमाड शहराचे योगदान. कारसेवेत शहरातील एकाच परिवाराच्या दोन महिलांचा सहभाग.
9 नोव्हेंबर 2019 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या येथील श्रीराम जन्म स्थानावर भव्य मंदिर उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला, 05 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते पवित्र श्रीराम जन्मभूमि वर भव्य श्रीराम मंदिराचे भूमिपूजन संप्पन होत आहे. जवळपास 500 वर्ष चाललेले जगातील हे हे एकमेव आंदोलन आहे. सर्व प्रथम आराध्य दैवत मर्यादा पुरूषोत्तम प्रभु श्रीराम चंद्र यांचे श्रीराम जन्मभूमिच्या मुक्ति साठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या सर्व लाखो शहीद श्रीराम भक्त कारसेवकांना भावपूर्ण आदरांजली. या जन्मभूमि मुक्ति साठी आपले आयुष्य वेचणाऱ्या करोड़ों भक्तानां कोटि कोटि नमन .
492 पेक्षा जास्त वर्षापासून सुरु असणार्‍या या श्रीराम जन्मभूमी मुक्तीच्या आंदोलनात मनमाड शहरातील ओम मित्र मंडळ आणि ओम मित्र मंडळाने श्रीराम जन्मभूमि आंदोलन मनमाड़ शहरात कार्यरत रहावे या उद्देश्याने स्थापन केलेल्या श्रीराम जन्मोउत्सव समिति मनमाड़ यांचे अतुलनीय भरीव व मोठे योगदान राहिले आहे. 1986 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ च्या विचारांनी प्रेरित झालेल्या मनमाड शहरात काम करणार्‍या युवकांनी एकत्र येऊन ओम मित्र मंडळाची स्थापना केली. ओम मित्र मंडळाच्या माध्यमातून अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमि मुक्ति आंदोलन सक्रिय होणे साठी श्रीराम जन्मोत्सव समितीची स्थापना करण्यात आली. 1986 पासून शहरात श्रीराम भव्य रथयात्रा मिरवणूकीचा प्रारंभ झाला. मनमाड शहराच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरे मध्ये मानाचे स्थान प्राप्त करीत सन 1986 ते 2019 अर्शी 33 वर्ष ही परंपरा ओम मित्र मंडळ व श्रीराम जन्मोउत्सव समिति ने अखंडित पणे सुरु ठेवली, यंदा कोरोना संकटा मुळे ही रथयात्रा होउ शकली नाही.
श्रीराम जन्मभूमि आंदोलन च्या दुसऱ्या टप्पा मध्ये 1989 साली मनमाड शहरात विश्‍व हिंदू परिषदेतर्फे शिलापूजनाचा मुख्य कार्यक्रम झाला. या काळात ओम मित्र मंडळाने या शिलापूजनाची संपूर्ण जबाबदारी स्वकारली. मनमाड शहरात व ग्रामीण भागात मंदिरे सार्वजनिक चौक येथे श्रीराम शिला पूजन कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन केले. खर्‍या अर्थाने श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलनासाठी मनमाड शहरातून कार्य सुरु झाले. मनमाड शहरात विश्‍व हिंदू परिषदेतर्फे श्रीराम कारसेवा समितीची स्थापना करण्यात आली.
सन 1990 साली झालेल्या अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलनाची लढाई ही जगाच्या इतिहासात सुवर्णक्षरांंनी लिहिली जाईल अशी होती. याच 1990 च्या आंदोलनात मनमाड शहरातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ओम मित्र मंडळ व श्रीराम जन्मोत्सव समिती यांच्या माध्यमातून हिंदूत्वाचे सक्रियतेने कार्य करणारे नितीन पांडे, अनिल चांदवडकर, प्रज्ञेश खांदाट, नाना शिंदे, पंकज जाधव, अमिष पारीक व स्व. संजय भावसार, हे सात श्रीराम कारसेवक अनिल चांदवडकर या वाहिनीप्रमुखाच्या नेतृत्त्वात अयोध्येकडे रवाना झाले. संपूर्ण देशभरामध्ये संवेदनाक्षम वातावरण होते, उत्तर प्रदेशमध्ये मुलायमसिंह यांचे सरकार असतांना या कारसेवेत सहभाग नोंदवणे हे देखील एक धाडसाचे काम होते. हे सात कारसेवक दि.24 ऑक्टोबर 1990 साली मनमाड येथून खडतर प्रवास करून अनेक अडचणींना तोंड देऊन अयोध्या गाठली. प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेवून हे सात कारसेवक मनमाड येथे आल्यानंतर विश्‍वहिंदू परिषद व श्रीराम कारसेवक समितीतर्फे यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी बाबा महाराज सिन्नरकर, मनमाड गुरुद्वारा प्रबंधक बाबा अजबसिंह, राष्ट्रीय स्वसंयेवक संघाचे स्व. रामकिसन झंवर, दत्तोपासक मंडळाचे संस्थापक स्व. बापूसाहेब दातार, आदी मान्यवरांच्या हस्ते हा सत्कार सोहळा संपन्न झाला.
सन 1992 साली 6 डिसेंबर रोजी झालेल्या अयोध्या येथील ऐतिहासिक श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलनामध्ये मनमाड शहरातून स्व. प्रभाकर थत्ते, यांच्या नेतृत्त्वामध्ये नितीन पांडे, अनिल चांदवडकर, प्रज्ञेश खांदाट, प्रशांत वीरगावकर , श्रीमती सुनंदा थत्ते, कु.दिपा थत्ते, निळकंठ त्रिभूवन, आदी कारसेवकांनी सहभाग नोंदवला. कारसेवेत एकाच परिवारातील दोन महिला उपस्थित होत्या. श्रीराम जन्मोत्सव समितीने शहरातील सर्व हिंदूत्ववादी पक्ष संघटना व नागरिकांना एकत्र करुन मनमाड शहरातील प्राचीन श्रीराम मंदिर आठवडे बाजार येथे श्रीराम जन्मोत्सव व भव्य श्रीराम रथयात्रेचे आयोजन सुरुच ठेवले. या श्रीराम जन्मोत्सव समितीच्या माध्यमातून सातत्याने अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मुक्तीच्या संदर्भात विविध प्रकारचे कार्यक्रम तसेच मिरवणुकीमध्ये देखावे करुन या आंदोलनाविषयी समाजप्रबोधन करण्याचे कार्य केले आहे. मनमाड शहरात सातत्याने श्रीराम जन्मभूमी आंदोलनाच्या कार्यात स्व. बाबा थत्ते ,स्व. मधुकर वावीकर, स्व. बाळासाहेब गटने, स्व. गजानन जोशी, सोमेश्‍वर बारपांडे, रमाकांत मंत्री, प्रकाश गाडगीळ, बाळासाहेब कुलकर्णी, नितिन पांडे, प्रज्ञेष खांदाट, किशोर गुजराथी,नाना शिंदे, अनिल चांदवाडकर, शेखर पांगुळ, कृष्णा शिंपी, विकास काकडे, किशोर नावरकर, रंगनाथ किर्तने, गोविंद रसाळ, भिकाजी कुलकर्णी, नीलकंठ त्रिभुवन, राजेंद्र वैजापूरकर, राजेंद्र खैरे, प्रदिप गुजराथी,दैलत नंदवानी , नीलेश खांदाट, स्व. पंकज पांडे शांताराम खांडगे, सुनिल सानप, प्रकाश कुलकर्णी, प्रकाश पवार, रोहित कुलकर्णी,हर्षल कुलकर्णी, संतोष बळीद, केशवराव पाटोळे, रमेश गवळी, सुभाष माळवतकर, भरत छाबडा सूर्यभान वडकते, दिनेश केकाण, सनी फसाटे गोपाळ कौराणी,दत्ता बारसे,अभिषेक भाबड, अक्षय सानप, कैलास भाबड, नारायण पवार, योगेश देशपांडे ,दीपक शिंदे समीर गुंजाळ,धीरज दुसाने आदी प्रमुख कार्यकर्त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. गेल्या 34 वर्षापासून मनमाड शहरात श्रीराम जन्मभूमी मुक्तीसाठी व श्रीरामाच्या कार्यासाठी ज्ञात अज्ञात श्रीराम भक्तांनी व कार्यकर्त्यांनी दिलेल्या योगदानासाठी ओम मित्र मंडळ आणि ओम मित्र मंडळ संचालित श्रीराम जन्मोत्सव समिती सदैव ऋणी राहील. खऱ्या अर्थाने 34 वर्षा नंतर राष्ट्र कार्याची स्वप्न पूर्ति होत आहे आम्ही प्रभू रामचंद्राचे वारस आहोत हीच भावना मनात ठेवून कार्य करणार्‍या सर्व श्रीराम भक्तांनी आता अतिभव्य श्रीराम जन्मभूमी मंदिर उभारण्यास कटीबध्द व्हावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here