6 डिसेंबर 1992 सालच्या कारसेवेत मनमाड मधील थत्ते परिवारातील सुनंदा थत्ते व दीपा थत्ते या मायलेकीं सह  बाबा थत्ते  अशा तीन व्यक्ती सहभागी

0

मनमाड ( प्रतिनिधी : रेवती गद्रे ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील श्रीराम मंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला असून . राममंदिरासाठी झालेल्या कारसेवेत मनमाड मधील कारसेवकांचा सहभाग होता. 6 डिसेंबर 1992 सालच्या कारसेवेत मनमाड मधील थत्ते परिवारातील सुनंदा थत्ते व दीपा थत्ते या मायलेकीं सह  बाबा थत्ते  अशा तीन व्यक्ती सहभागी होत्या. आज सुमारे 73 वर्षांच्या असलेल्या सुनंदा थत्ते यांनी हा सोहळा टीव्हीवरून बघतांना आनंद व्यक्त केला.
एकोणविशे नव्वद साली  झालेल्या पहिल्या कारसेवेत येथील नितीन पांडे, रमाकांत मंत्री,अनिल चांदवडकर, प्रज्ञेश खांदाट, नाना शिंदे, पंकज जाधव,आमिष पारिक,स्व.संजय भावसार हे साथ कारसेवक सहभागी झाले होते.
1992 ला  झालेल्या कारसेवेत येथील ज्येष्ठ स्वयंसेवक कै.  प्रभाकर थत्ते यांच्या नेतृत्वाखाली नितीन पांडे, प्रज्ञेश खांदाट, आनिल चांदवडकर, सुनंदा थत्ते, दीपा थत्ते ,नीळकंठ त्रिभुवन, प्रशांत वीरगावकर, असे सहभागी झाले होते.  प्रभाकर थत्ते, सुनंदा व दीपा थत्ते हे एकाच थत्ते परिवाराचे सदस्य असून सुनंदा थत्ते व दीपा थत्ते या दोन महिलांचा कारसेवेतील सहभाग या काळात संपूर्ण शहरात कौतुकाचा व कुतूहलाचा विषय ठरला होता. प्रभाकर थत्ते यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पत्नी सुनंदा थत्ते यांनी आज टीव्हीवर सोहळा  बघताना  अतिशय आनंद झाल्याची भावना व्यक्त करून, 28 वर्षांनी हा सूर्य उगवला व हा  सोहळा बघण्याचे भाग्य मला लाभले अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करून श्रीराम  मंदिराचे बघितलेले स्वप्न आता पूर्णत्वास येत आहे असे सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here