नोंदनीकृत बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक अभ्यास व परिक्षा देण्याकरिता मोफत मोबाईल टॅब देण्यात यावे – सय्यद मिनहाजोद्दीन

0

बीड ( प्रतीनिधी) सद्या संपूर्ण महाराष्ट्र राज्य मध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढलेला असून सर्व शाळा व महाविद्यालये बंद असल्यामुळे मूलांचे शिक्षण ऑनलाईन पध्दतीने घेण्याचा शासनाचा निर्णय असल्यामूळे तसेच महाराष्ट्र राज्य मध्ये मोठ्या प्रमाणात हा मोल मजूर कामगार वर्ग राहत असून सध्याच्या परिस्थिती मध्ये कामगार मजूरांना हाताला काम नसल्यामुळे रोजचे दैनंदिन जिवन जगने मश्किल झालेले आहे.अशा बिकट परिस्थितीत कामगार आपल्या मूलांना ऑनलाईन शिक्षण घेण्या करिता ” स्मार्ट फोन ” घेऊन देणे मूश्किल झाले आहे. व ते घेणे सद्य स्थितीत कदपी शक्य न होनारे आहे. त्यामुळे बर्याच ठिकाणी कष्टकरी कामगारांच्या मूलांनी शिक्षणसाठी आपल्या गरीबीच्या हलाकिच्या परिस्थितीत आपल्या मजूर पालकांच्याकडून ” स्मार्ट फोन” मिळत नसल्यामुळे नैरश्यतून आत्महत्या केलेली असून आपले जिवन संपवले आहे. ही बाब अत्यंत गांभीर्यानेि घेणे गरजेचे आहे.या परिस्थितीत कष्टकरी कामगारांच्या मूलांचे शैक्षणिक नूकसान होणार आहे हे नाकारता येणार नाही. त्यामुळे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ महाराष्ट्र राज्य मूंबई यांच्याकडे बांधकाम कामगार यांच्या कल्याणासाठी शिल्लक असणारा कोट्यवधीच्या शिल्लक निधी मधून शैक्षणिक आर्थिक साह्य या योजने अंतर्गत मंडळाच्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या शिक्षण घेत असलेल्या दोन मूलांना मोफत ” मोबाईल टॅब ” विना विलंब देण्यात यावा.तसेच कष्टकरी बांधकाम कामगारांच्या मूलांचे होणारे शैक्षणिक नूकसान व त्या नूकसानी मूळे होणार्या आत्महत्या रोखण्यासाठी निर्बंध आणि उपाय योजना राबवाव्यात कारण आजची मूले हे उद्याचे देशाचे भविष्य आहे .त्यामुळे सर्व गोरगरिब कूटूंबातील मूले शिकली पहीजेत .त्याचबरोबर सूरक्षित राहीली पाहीजेत.या करिता निधीमधून तात्काळ विना विलंब बांधकाम कामगारांच्या मूलांना ” मोबाईल टॅब ” देण्यात यावा.आशी मागणी चे निवेदन मा जिल्हाधिकारी बीड यांच्या द्वारे मूख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. कामगारमंत्री महाराष्ट्र राज्य देण्यात आले. निवेदन देताना मराठवाडा बांधकाम मजूर व ईतर कामगार संघटनेचे सचिव सय्यद मिनहाजोद्दीन.संस्थापक अध्यक्ष शफीक पठाण. अध्यक्ष रफीक मोमीन.कार्यकरीणी नदीमोद्दीन काजी .अश्विनी फाटक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here