वडिलोपार्जित शेतीत गेल्याचा राग आला म्हणून जातीयवाचक शिविगाळ करुन व मारहाण करुन विष पाजून जिवेठार मारण्याचा प्रयत्न करणारया विरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

0

खेडेगांव (प्रतिनिधी) – स्वताच्या वडिलोपार्जित शेतीत गेल्याचा राग येवुन व शेतीच्या वादातून खेडगांव ता.दिंडोरी जि.नाशिक या ठीकाणी शिवम विजय गांगुर्डे या युवकास १] पवन उर्फ रोहीत कांतिलाल व्यवहारे २] अमोल उर्फ अम्याभाई व्यवहारे ३] महेश उर्फ पप्या दत्तात्रय व्यवहारे ४] बाळासाहेब उर्फ चघळ्याबाळु रघुनाथ व्यवहारे ५] ऋषीकेश बाळासाहेब व्यवहारे व ईतर ४ ते ५ महीलांसह व्यक्तिनी जातीयवाचक शिविगाळ करुन लाथाबुक्यानी मारहाण करून विष पाजून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारया जातीयवादी व मानवतेला काळीमा फासण्याचा प्रयत्न करणारया नराधमांवर कायदेशीर व कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अन्याय अत्याचार निर्मुलन समिती महाराष्ट्र (राज्य) या सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
सदर युवक खेडगांव प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत वणी येथील ग्रामीण आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
संबंधित गुन्हेगारांवर कडक व कठोर कारवाई करुन न्याय मिळावे व संबंधित दलीत कुटुंबीयांस वरील जातीयवादी नराधमांकडुन पोलीस संरक्षण मिळावे अशीही मागणी तक्रारदार युवकाच्या पालकांनी दिंडोरी तालुक्यातील वणी पोलीस स्टेशनला केली आहे. या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक व विषेश पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांना अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे शिष्टमंडळ भेटुन संबधित अन्यायग्रस्त व्यक्तिला न्याय मिळवून दीला जाईल अशी माहीती प्रदेश अध्यक्ष मा.रविंद्र दादा जाधव, वसंतराव वाघ, वैशाली चव्हाण, मनिषा म्हसदे, रविराज सोनवणे, रेखा मंजुळकर, रफीक सैयद, ममता पुणेकर वैशाली जाधव, तरन्नुम शेख, जसपालसिंग कोहली, प्रदीपनाना गांगुर्डे, हिरामण मनोहर, प्रदीप पगारे, मनिषा पवार,वर्षा आहीरे, संदीप साबळे,मिरा डोळस, अँड.सुनिल शेजवळ, राजेंद्र दाणी, संदेशा पाटील, धनश्री उपाध्ये, राधा क्षीरसागर, मिना पठाण आदींनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here