तयारी , बाप्पाच्या आगमनाची

0

मनमाड : महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि लहान पासून ते मोठ्या पर्यंत सर्वांचा आवडता म्हणजे गणेश उत्सव होय. या वर्षीचा गणेश उत्सव हा काही दिवसांवर आलेला आहे परंतु यंदाच्या वर्षी मात्र गणेश उत्सवावर कोरोना महामारीचे संकट असल्याने अनेक निर्बंध आहे .महाराष्ट्र मध्ये अनेक सार्वजनीक मंडळे गणेश उत्सव हा खुप मोठया स्वरूपात विविध संकल्पनेतून साजरा करत असतात त्याच प्रमाणे घरघुती स्वरूपात देखील मोठ्या प्रमानात गणेश उत्सव हा साजरा होत असतो. परंतु यंदा च्या वर्षी सार्वजनिक मंडळांना अनेक नियम व अटी लागू करून गणेश उत्सव हा साधेपणाने साजरा करण्याचे आव्हान राज्य सरकाने केलेले आहे. उत्सव काळातील गणेश मूर्तीची उंची देखील 4 ते 5 फुट असावी असा नियम देखील यंदा च्या वर्षी सार्वजनिक मंडळांना करण्यात आलेला आहे.
सध्या अनेक मूर्तीकारांचे गणेश मूर्ती बनवण्याचे काम हे शेवटच्या टप्यात चालु आहे .मनमाड येथील प्रसिद्ध मूर्तीकार स्वामी नारायण आर्ट हे साधारण 2005 पासुन शाडू मातीच्या मूर्ती बनवत आहे , दरवर्षी यांनी बनवलेल्या शाडू मातीच्या मूर्तीला विशेष मागणी असते , दर वर्षी अनेक नागरिक हे काही दिवस आगोदरच आपली मूर्ती बुक करून जात असतात , परंतु या वर्षी मात्र इतर व्यवसायांन प्रमाणेच गणेश मुर्ती व्यवसायावर देखील चालु असणाऱ्या कोरोना परिस्थितीचा थोडा फार परिणाम जाणवत आहे . आपण सर्व विघ्नहर्ता गणेशाला प्रार्थना करू या की, या देशावर आणि जगावर आलेल कोरोना रुपी विघ्न दूर करून सर्वांना सुखी व निरोगी ठेव,,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here