मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालयाचा शालांत परीक्षेचा निकाल शंभर टक्के

0

मनमाड ( प्रर्तिनिधी- हर्षद गद्रे  ) मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालयाचा शालांत परीक्षेचा निकाल शंभर टक्के
राष्ट्रीय शिक्षण संस्था संचलित मनमाडच्या मध्यरेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता 10वी परीक्षेचा निकाल शंभर टक्के इतका लागला आहे..हिमानी सुरेश खरात ही विद्यार्थिनी 94.80% गुण मिळवून विद्यालयात प्रथम आली. वैशाली विजय रोकडे या विद्यार्थीनीने 91.80% गुण मिळवून विद्यालयातून द्वितीय क्रमांक मिळविला. समीक्षा किशोर पगारे या विद्यार्थिनीने 90% गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. हिमानी सुरेश खरात या विद्यार्थीनीने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून हे यश मिळविले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संचालक मंडळाचे सदस्य मुख्याध्यापक व शिक्षक आणि शिक्षकेतर वर्गातर्फे अभिनंदन केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here