घराच्या छतावर विद्यार्थ्यांचा वर्ग घेण्याची जिद्द

0

सिल्लोड (  प्रतिनिधी -विनोद हिंगमीरे ) शिंदेफळ केंद्र आमठाणा या शाळेतील इयत्ता पाचवी सहावी आणि सातवी चे एका गल्लीतील विद्यार्थ्यांचा गट असे एकूण दहा गट तेथील शिक्षकांनी केलेले असून त्यापैकी एका गटाला आज ऑनलाईन भेट दिली गावातील इयत्ता बारावी उत्तीर्ण एक विद्यार्थिनी गटप्रमुख आणि विषय मित्र म्हणून काम करीत असून आज गणित विषयाची परीक्षा घेण्यात आली. चार महिन्यांपासून शाळा बंद आहेत- लॉकडाऊन आहे. आज रविवार आहे तरीही घराच्या छतावर विद्यार्थ्यांचा वर्ग घेण्याची जिद्द निश्चितच कौतुकास्पद आहे. शिंदेफळ या तालुक्यातील उत्कृष्ट शाळेतील हे चित्र तालुक्यातील सर्वच शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही. शिंदेफळ येथील सर्व शिक्षक मुख्याध्यापक यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि कौतुक……..!*

*गटशिक्षणाधिकारी*
*पंचायत समिती सिल्लोड*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here