वागदर्डी धरण परिसरात “सीडबॉल” रोपण संपन्न.

0

मनमाड – शहरामधील सामाजिक कार्यात नेहेमी अग्रेसर असणार्या मनमाड बचाव कृती समिती आणि मनमाड जनहित विकास संस्था यांच्या द्वारे वागदर्डी धरण परिसरामध्ये सिडबॉल म्हणजे वृक्ष बियांचे मातीचे गोळे बनवून त्याचे रोपण करण्यात आले. पांझन नदी जेथे धरणाला मिळते तेथील परिसरा मध्ये अनेक प्रकारच्या स्वदेशी झाडांच्या बियांच्या मातीच्या गोळ्यांचे खड्या मध्ये रोपण करण्यात आले , या उपक्रमाचा भविष्यात नक्कीच फायदा होईल , आज रोपण केलेल्या झाडांच्या बिया या उद्या नक्कीच मोठ्या झाडांमध्ये रूपांतरित होतील आणि पर्यावर्णाला या झाडांची मदत होईल.मनमाड बचाव कृती समिती द्वारे असे नव-नवीन उपक्रम हे नेहमी राबवले जातात , गेल्या अनेक वर्षा पासून समिती ही मनमाड पाणी प्रश्नांसाठी काम करत आहे , समिती द्वारे मनमाड शहरातील आणि परिसरातील जमिनीतील पाण्याची पातळी वाढावी या साठी अनेक शोष खड्डे खोदून त्यात पाणी जिरवण्याचा प्रयोग खुप मोठ्या प्रमाणत राबण्यात आलेला आहे. समिती द्वारे मनमाड पाणी समस्येसाठी अनेक वेळा अनेक प्रकारची आंदोलने देखील करण्यात आलेली आहे.मनमाड जनहित विकास संस्थे द्वारे शहरात महात्मा फुले अभ्यासिका चालवण्यात येते , शहरातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची गैर सोय ओळखून ही अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे आज या अभ्यासिकेचा अनेक विद्यार्थी लाभ घेत आहे , अभ्यासिकेच्या परिसरामध्ये ही संस्थे द्वारे अनेक प्रकारच्या स्वदेशी झाडांची लागवड करून खुप सुंदर अशी बाग फुलवण्यात आलेली आहे.या दोनीही संस्था या शहराला नव संजीवनी देण्याचे काम नेहेमी करत असतात , आज राबलेल्या सिडबॉल उपक्रमाचा फायदा हा मनमाडकर नागरिकांना भविष्यात नक्कीच होईल.जेष्ठ समाजसेवक श्री आप्पा जी परदेशी आणि चांदवड वन विभागाचे अधिकारी श्री राम महाले यांच्या मार्गदर्शना मध्ये मनमाड बचाव कृती समिती आणि मनमाड जनहित विकास संस्थेच्या सर्व सदस्यांन द्वारे उपक्रम यशस्वी करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here