नांदगाव ( प्रतिनिधी – निखील मोरे )नांदगाव नगरपरिषदेचा सेवकांमुळे संपूर्ण नगरपरिषदेला कोरंटाईन व्हावे लागले होते त्या कर्मचाऱ्याचा कोरोना चाचणी अहवाल काल रात्री उशिरा प्राप्त झाला असून तो कर्मचारी कोरोना बाधित झाला आहे .त्यामुळे कर्मचारी वर्गात एकाच खळबळ उडाली आहे.नाशिक येथे असलेल्या नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांनी आज तात्काळ नांदगाव गाठत संबंधित कर्मचाऱ्यांची बैठक घेतली आहे मात्र तपशील समजू शकलेले नाही. दरम्यान कोरोना बाधित कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांचे स्वँब उद्या घेतले जाणार असल्याचे मुख्याधिकारी डॉ.श्रिया देवचके यांनी सांगितले आहे.नांदगाव शहरात कोरोनाचा संसर्ग बऱ्यापैकी नियंत्रणात आहे परंतु बाहेर गावाहून अप – डाऊन करत असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी हेच कोरोनाचा वाहक बनत असून त्यांच्यामुळे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याची चर्चा नागरिकांत आहे. यामुळे बाहेर गावहून अप – डाऊन करत असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांचा मुद्दा पुन्हा कळीचा ठरणार आहे. यामुळे नांदगावच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.नांदगाव शहरात कोरोना बाधितांची संख्या दोन असून पुढील काळात संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान,गेल्या दोन दिवसापासून नांदगाव नगरपरिषद नागरिकांसाठी कुलूपबंद ठेवण्यात आली आहे.