जळगांव – जळगाव, भुसावळ, धुळे शहर व जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह चे रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे . वास्तविक बघता देशातच हे आकडे झपाट्याने वाढत आहेत . तज्ज्ञांनी जुलै मध्ये कोरोनाचा तज्ञांच्या मते जुलै महिन्यात याचा जास्त मोठ्या प्रमाणात संसर्ग होऊ शकतो असे वर्तवले आहे, असेल, अशी त्यामुळे लॉक डाउन पाच सुरु आहे . सोबतच अन लॉक दोनही सुरू आहे . शासनास कोरोनावर नियंत्रण व आर्थकारण दोन्ही बाबी सांभाळत तारेवरची कसरत करावी लागत आहे . त्यामुळे त्या भागात कर्फ्यू , टोटल लॉक डाउन परिस्थिती नुसार लावण्याचे अधिकार सरकारने स्थानिक प्रशासनास दिले आहेत . खान्देशात जळगाव व धुळे जिल्ह्यांची स्थिती गंभीरतेकडे वाटचाल करीत आहे . येथील मृत्यू प्रमाण दरही अधिक वाढत आहे . जळगावचा मृत्यू दर हा देशात सर्वाधिक नोंदला गेला आहे . त्यामुळे खान्देशातील विषाणू हा नेमका कोणत्या प्रकारचा आहे लोकांना समजेनासे झाले आहे, या बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे . रुग्णास लवकर लक्षणे दिसत नाहित . आजाराचे लक्षणे दिसून रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यावर काही रुग्णांवर उपचारासाठी वेळच मिळत नाही . त्याच्या आतच त्याचे निधन होवून जाते . त्यामुळे खान्देशातील रुग्णांचे स्वॅब खास या तपासणीसाठी पुण्यास पाठविण्यात आले आहेत . या सर्व पार्श्वभुमीवर आता जळगाव जिल्ह्यात जळगाव , भुसावळ आणि अमळनेर या तीन मोठ्या शहरात आठवड्याचा कडक लॉक डाउन जाहिर करण्यात आला आहे . धुळ्यातले देखील आकडे चिंता वाढविणारे आहेत . यास्तव शहरात विविध लोकप्रतिनिधी , नगरसेवकांनी टोटल लॉक डाउनची मागणी केली आहे . शहराचे आमदार व महापौर यांच्या भावांचे कोरोनात निधन झाले आहे . त्यामुळे शहरात गांभिर्य अधिकच वाढले आहे . मात्र बाजारपेठेत कोरोनाचे गांभिर्य मुळी सुध्दा दिसत नाही तोंडाला मास लावणे किंवा सोशल डिस्टन्स एकाच ठिकाणी गर्दी न करणे याचे नियम पाळत नसल्याचे दिसून येत आहे . यामुळे मनपात स्थायी सभापती आणि नगरसेवकांनी चक्क आयुक्तांनाच घेराव घालून टोटल लॉक डाउनची मागणी केली . त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी शहरातील दुकाने सायंकाळी पाच ऐवजी चारलाच बंद करण्याचा आदेश काढला . म्हणजे एक तासाने कर्फ्यूचा वेळ वाढविला . काही नागरिकांनी शनीवार , रविवार टोटल लॉक डाउनची मागणी केली होती . परंतु एकिकडे लोकप्रतिनिधीं कडून कडक लोकडाउनची मागणी होत आहे तर दुसरीकडे व्यावसायिकांकडून अन लॉकची मागणी होते . त्यामुळे प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे . टोटल लॉक डाउन केल्याने व्यवहार ठप्प होतात , त्यामुळे शासनाच्या महसूल तिजोरीत कर जमा होत नाही . त्यामुळे महामारीच्या नियंत्रणासाठी लॉक डाउन व अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी अन लॉक अशा परस्पर विरोधी . भुमिकांमध्ये समन्वय साधत , बॅलन्स करीत करीतच शासनाला व सर्व यंत्रणांना काम करीत रहावे लागणार आहे. कोरोना संसर्ग महामारी मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यावर अद्याप औषध उपलब्ध झालेले नाही ,त्यामुळे तो काळजीचा विषय बनला आहे, अशा या कोरोनाचा सामना करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये स्वच्छता सोशल डिस्टन्स अशा काही सवयी स्वतःहून आपण लावून घेतल्या पाहिजे,