
नांदगाव-प्रतिनिधी ( निखिल मोरे ) तालुक्यात गेल्या काही दिवसा पासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.नस्तनपुर येथील श्रीक्षेत्र शनैश्वर मंदिरातील परिसर काल संपूर्ण पाण्याखाली गेला होता. देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनैश्वर मंदिर दर्शनासाठी बंद आहे.
तालुक्यात जोरदार पाऊस पडत असल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.श्रीक्षेत्र नस्तनपुर येथील शनैश्वर मंदिर राज्यात प्रसिद्ध आहे. येथे भाविकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. प्रभु श्रीराम यांच्या हस्ते शनी महाराज यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आल्याचे सांगितले जाते.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर सध्या बंद आहे.शनी महाराज याची नित्यनेमाने दररोज सकाळी व संध्याकाळ पुजारी पुजा करतात.तालुक्यात गेल्या काही दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावल्यानेमंदिराचा परिसर पाण्याखाली गेला आहे.या आठवड्यात मंदिर दुसऱ्यांदा पाण्याखाली गेले आहे,
