पर्यटकांनी बेजबाबदारपणे वागू नये – पो.उपविभागीय अधिकारी- समिरसिंग साळवे

0

येवला – ( राजेंद्र परदेशी प्रतिनिधी ) मनमाड येवला येथील हौशी पर्यटक लॉकडाऊन काळात अंकाई किल्ल्यावर बंदी असून किल्ल्यावर मौजमजा करण्यासाठी कायमस्वरूपी दादागिरीने येऊन राजरोस फिरत असताना मनमाड उपविभागीय अधिकारी समीरसिंग साळवे व येवला पोलीस स्टेशनचे निरीक्षक भवारी साहेब, एपीआय राजपूत साहेब, एपीआय भिसे, व वाहतूक शाखेचे कर्मचारी पवार इतर पोलिस कर्मचारी यांनी अंकाई किल्ला येथे धडक मोहीम राबवून रविवारी सकाळी 9.30 ते सायंकाळी 7.00 वाजेपर्यंत येणाऱ्या-जाणाऱ्या मोटर सायकल व इतर वाहने यांचावर दंडात्मक कारवाई केली या कारवाईत त्यांनी 200,400 असा दंड आकारण्यात आला, काही पर्यटक बेशिस्त मोटरसायकल पर्यटकांना उठबस करण्यास लावली, या धडक मोहिमेत 9500 रुपये दंडात्मक महसूल वसूल करण्यात आला, अंकाई किल्ल्या वरती लॉक डाऊन च्या काळामध्ये बंदी असल्यामुळे किल्ल्यावर कोणी बेकायदेशीर येऊ नये तसेच बेकायदेशीर वागू नये नियमाचे उल्लंघन केल्यास त्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे पोलीस उपविभागीय अधिकारी समीरसिंग साळवे यांनी व्यक्त केले आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here