रोटरी क्लब मनमाडचा पदग्रहण समारंभ संपन्न

0

मनमाड ( प्रतिनिधी हर्षद गद्रे ) :- रोटरी क्लब मनमाडचा पदग्रहण समारंभ संपन्न झाला. नूतन अध्यक्ष  लवकुमार माने यांनी शपथ घेतली तर सचिव म्हणून  आनंद काकडे यांनी पदभार स्वीकारला.प्रमुख अतिथी  विकास काकडे  उपस्थित होते. अध्यक्ष म्हणून  नरेश गुजराथी उपस्थित होते. मावळते अध्यक्ष दिनेश बेदमुथा यांनी वर्षभर केलेल्या कार्यामध्ये सहकार्य करणारयांचा  आवर्जून उल्लेख करुन सर्वांचे आभार मानले. आंतरराष्ट्रीय रोटरी संघटनेद्वारे दिनेश बेदमुथा यांना पॉल ह्यारिस  सन्मानाने गौरविण्यात आले आहे. मावळते सचिव डॉ. भूषण शर्मा यांनी वर्षभरातील सेवा कार्याचा आढावा घेऊन आगामी कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या. नूतन अध्यक्ष लवकुमार माने यांनी वर्षभरात क्लब द्वारे घेतल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.  रोटरी क्लब मध्ये तीन नूतन सदस्यांना सदस्यत्व देण्यात आले.  रोटरी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ माने यांनीदेखील वर्षभरात घेतल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती देऊन सर्वांना सहकार्याचे आवाहन केले प्रमुख अतिथी विकासकाकडे यांनी रोटरी क्लब सोबत  असलेल्या ऋणानुबंधाचा उल्लेख करून नुतन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेश गुजराथी यांनी रोटरी क्लबच्या जुन्या आठवणींना उजाळा देऊन रोटरी क्लबच्या आजवरच्या वाटचालीचे कौतुक केले.  रोटरी क्लबच्या कार्याचे वर्षभर वार्तांकन केल्याबद्दल पत्रकार हर्षद गद्रे, रोटरीच्या कार्यात सहभागी झाल्याबद्दल गप्पी थकराल, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन मनमाडचे व्यवस्थापक हर्षवर्धन यांचा  सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ सदस्य गुरुजित्सिंग कांत व सुभाष गुजराथी यांनी केले कोरोना बद्दल चे सर्व नियम पाळून सोशल डिस्टंसिंग चा वापर करून सूत्रबद्ध नियोजन पद्धतीने हा कार्यक्रम संपन्न झाला पदग्रहण सोहळ्यानंतर रोटरी क्लबच्या वतीने जनाई लॉन्स येथे आठ वृक्षांचे रोपण करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here