आमदार सुहास अण्णा कांदे यांची ग्राहकांच्या वतीने युनियन बँक प्रशासना विरोधात फसवणूकचा गुन्हा (FIR) दाखल.

0

मनमाड : मनमाड शहरातील युनियन बँकेत मनमाड शहर व परिसरातील असंख्य ग्राहकांची खोट्या एफ.डी. व इतरही मार्गाने फसवणूक झाली.सदरील प्रकार हा अनेक महिन्यांपासून सुरू असल्याचा अंदाज आहे. यामध्ये अनेक शेतकरी, नोकरदार,पेन्शनर,व्यापारी आहेत.हा प्रकार लक्षात आल्यानंतर एका रात्रीतून बॅंक प्रशासनाने तडका फडकी सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या इतरत्र बदल्या करून टाकल्या. ग्राहकांच्या समोर हा प्रकार उघडकीस आल्यावर घाई घाईने बँक मॅनेजरने याविषयी विमा कंपनीचा एजंट असणाऱ्या व बँकेत शाखाप्रबंधकाच्या मर्जीने बसलेल्या संदीप देशमुख याच्या विरोधात तक्रार नोंदवून या प्रकरणातून हात झटकण्यासारखा प्रकार केला. ग्राहकांची झालेली फसवणूक व हात झटकून मोकळे होत असलेले बँक प्रशासन यामुळे आधीच दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे हातबल झालेल्या ग्राहकांनी आमदार सुहास आण्णा कांदे यांच्याकडे धाव घेऊन आमदार साहेबांना लेखी निवेदन दिले व या सर्व अपहार प्रकरणात न्याय मिळवून देण्याची मागणी केली.तालुक्याचे पालकत्व आपल्याकडे आहे त्यामुळे आपणच या प्रकरणात स्वतः पुढाकार घेऊन न्याय मिळवून आम्हाला आमच्या कष्टाचे पैसे परत मिळवून देण्यासाठी ग्राहकांनी साद घातली. त्याला प्रतिसाद देत आमदार सुहास आण्णा कांदे यांनी पीडित ग्राहकांच्या बैठकीत आश्वासित केल्याप्रमाणे शब्दाला जागत आज दिनांक 25/5/24 रविवार रोजी सायंकाळी अनेक पीडित ग्राहकांच्या सोबत मनमाड पोलीस स्टेशनला जात पोलीस निरीक्षक अशोक घुगे यांचेकडे आमदार कार्यालयातील सहाय्यता कक्षात लेखी तक्रार दिलेल्या सर्व ग्राहकांच्या वतीने आमदार सुहास आण्णांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसमवेत जात तक्रार दाखल केली.सदरील तक्रारीत आमदार साहेबांनी विमा एजंट सुधीर देशमुख सोबतच युनियन बँक प्रशासनास दोशी मानत, याची सर्व जबाबदारी ही बँक प्रशासनाची असल्याचे सांगत तशी तक्रार दाखल केली. त्याची भरपाई देखील युनियन बँकेने करून देण्याचे आवाहनही त्यांनी बँक प्रशासनास केले आहे.मात्र 8 दिवसात यासंबंधी बँक प्रशासनाने योग्य निर्णय न घेतल्यास आपण स्वतः पीडित ग्राहक व शिवसेना पदाधिकाऱ्यांसमवेत नासिक येथील युनियन बँकेच्या हेड ऑफिसबाहेर दरवाज्यातच लोकशाही मार्गाने आंदोलन करू असा इशारा आमदार सुहास आण्णा कांदे यांनी दिला आहे.याप्रसंगी पीडित ग्राहकांनी दिलासा व्यक्त करत आमदार साहेबांचे आभार मानले.

( आ.मयुर बोरसे. शिवसेना शहरप्रमुख, मनमाड.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here