आतापर्यंत एकाच कुटुंबात सर्व सत्ता केंद्रित झाल्या आता शिवशंकर राजळे यांच्या पाठीशी उभे रहाः काशिनाथ पाटील लवांडे

0

अहमदनगर : (सुनिल नजन”चिफ ब्युरो”अहमदनगर जिल्हाप्रतिनिधी) अहिल्यानगर/अहमदनगर जिल्हा हा “सोधा”पक्ष म्हणजे सोयऱ्या धायऱ्यांचा जिल्हा आहे. कोणत्याही निवडनुकित सोधापक्ष फँक्टर अतिशय महत्त्वाची भुमिका बजावत असतो.जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील ग्रामपंचायत, सोसायटी, पाणी वापर संस्था, खरेदी विक्री संघ,बाजार समिती, जिल्हा परिषद, पंचायत समिती,साखर कारखाना,आमदारकी, खासदारकी या सर्व सत्ता एकाच कुटुंबात केंद्रीत झाल्या आहेत आता शिवशंकर राजळे यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे रहा असे आवाहन पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती जेष्ट नेते काशिनाथ पाटील लवांडे यांनी केले. ते मढी येथील चैतन्य कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या अन्न छत्रालय सभागृहात बोलत होते. आदिनाथ नागरी पतसंस्थेचे चेरमन(अर्जुनआबा)उर्फ अर्जुनराव दादाबा राजळे यांच्या एकाहत्तर मधून बहात्तराव्या वर्षात प्रवेश केलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्या प्रसंगी बोलत होते.राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्रजी पवार गटाच्या जिल्हा महिला अध्यक्षा सौ.योगिता शिवशंकर राजळे यांनी आपले सासरे आबा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांसाठी प्रितीभोजनाचे आयोजन केले होते.त्यावेळी नगर जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काशिनाथ पाटील लवांडे पुढे म्हणाले की अर्जुनआबा नंतर सुसंस्कृत आणि संयमी नेतृत्व हे शिवशंकर राजळे यांचे आहे. भविष्यात त्यांना राजकीय ताकद देणे अत्यंत महत्त्वाचे असुन आपण सर्वांनी अतिशय खंबीर पणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे असे सांगितले. अभिष्टचिंतन सोहळ्या प्रसंगी अनेक कार्यकर्त्यांनी अर्जुनराव राजळे यांना पुढील आयुष्यासाठी सुबेच्छा दिल्या. यावेळी व्रुद्धेश्वर साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक सुभाषराव ताठे,अच्युतराव वाघ,डॉ बाळकृष्ण मरकड, शिवशंकर राजळे,शंतनुराव राजळे, माजी सरपंच सौ मंगलताई राजळे, संदिप राजळे, बंडूपाटील बोरुडे, स्वप्नील देशमुख, मारुती दगडखैर साहेब, मुकुंदराव गायकवाड,हुमायून आतार,इलियास शेख सर,बाळासाहेब लवांडे, विकास लवांडे,ज्ञानदेव राजळे,अमोल वाघ,माणिकराव म्हस्के आणि पार्थ पब्लिक स्कूल आणि आदिनाथ नागरी पतसंस्थेचे सर्व कर्मचारी आणि जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते. मढी येथील कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी देवस्थानच्या सर्व खुर्च्या बदलन्याची गरज निर्माण झाली आहे. भर कार्यक्रमात डॉ बाळकृष्ण मरकड,आणि संदिप राजळे यांच्या बसलेल्या जागेवरच खुर्च्या मोडून किरकोळ ईजा झाली.देवस्थानने आता असलेल्या सर्व खुर्च्या बदलून अतिशय दणगट अशा नवीन खुर्च्या खरेदी कराव्यात अशी सर्व सामान्य भाविकांची मागणी आहे.अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात हा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील राजकीय समिकरणे बदलन्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here