पोलिस निरीक्षक मुटकुळे साहेब “कानुन के हाथ बहुत लंबे होते है” तुम्ही पाथर्डीतील गुन्हेगारी चकाचक करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत : ढाकणे

0

अहमदनगर :(सुनिल नजन” चिफ ब्युरो “/अहमदनगर जिल्हा स्पेशल क्राईम रिपोर्टर अहमदनगर जिल्हा ) ‌ अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव- पाथर्डी विधानसभा मतदारसंघात सगळीकडेच गुन्हेगारी बोकाळली आहे.पाथर्डीचे पोलिस निरीक्षक मुटकुळे साहेब “कानुन के हाथ बहोत लंबे होते है”.तुम्ही पाथर्डीतील गुन्हेगारी चकाचक करा आम्ही तुमच्या खंबीरपणे पाठीशी उभे आहोत असे आश्वासन केदारेश्वर कारखान्याचे माजी चेअरमन प्रतापराव ढाकणे यांनी दिले.ते पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये ग्रामीण भागातील सामान्य माणसाच्या आलेल्या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यां सोबत गेले होते.त्यावेळी ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की बदलून गेलेले पोलिस निरीक्षक चव्हाण साहेब यांनी पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये चकाचक करून गेले आहेत.त्यांच्या समवेत विष्णूपंत ढाकणे, बाबासाहेब ढाकणे, देविदास खेडकर, माणिक खेडकर, शिवशंकर राजळे, भगवान दराडे , दिनकरराव पालवे, सिताराम बोरूडे, बंडू बोरुडे, गहिनीनाथ शिरसाठ यांच्या सह अनेक गावांतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.पाथर्डी तालुक्यात अनेक गावांत गुन्हेगारी वाढली आहे.गुन्हेगाराला पक्ष नसतो ती व्रु्त्‍ती जोपासली तर ती सर्वांसाठी घातक असते.पाथर्डी तालुक्यातील व्यापारी पेठ धोक्यात आली आहे.दुकानदारांनो कोणाच्याही बापाला भिउ नका मी तुमच्या पाठीशी उभा आहे असे आश्वासन प्रतापराव ढाकणे यांनी यावेळी दिले.लोकप्रतिनिधी जर गुन्हेगारांना जवळ करीत असतील तर ते आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा ही त्यांची दिला.शेअर मार्केट पासून सावध रहा ते खोटे व फसवे आहे.पाथर्डी तालुक्यातील कट्टे शोधा, गुन्हेगारी व्रुत्तीची माणसे आपल्या मुलांना जाळ्यात ओढतात.त्यांना खायला प्यायला घालतात आणि हळूच त्यांच्या आयुष्याची बरबादी करतात.हे कुठे तरी थांबले पाहिजे.पाथर्डी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी सांगितले की आम्ही पकडलेल्या गुन्हेगारांकडून बीड जिल्ह्यातील दोन आणि पाथर्डी तालुक्यातील सात गुन्हे उघड केले आहेत.त्या सातही गुन्ह्याची कायदेशीर प्रोसेस होणार आहे.आपल्याला ग्राम सुरक्षा दल अॅक्टीव करावे लागेल.त्यांना आयडेंटि कार्ड दिले जातील.त्यांना गावा गावात गस्त घालीत फिरणाऱ्या आमच्या पोलिसांचे नंबर दिले जातील.म्हणजे गावात काही गैरप्रकार घडल्यास पोलिस तात्काळ हजर होतील.शालेय विद्यार्थीनींना त्रास देऊन छेडछाड करणाऱ्या रोडरोमीओच्या विरोधात एक पथक तयार केले आहे.ज्या परीसरात शालेय विद्यार्थिनींना त्रास दिला जातो तेथे जाऊन ते छेडछाड विरोधी पथक कारवाई करते.पकडलेल्या आरोपींना मोक्का कायदा लावण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here