क्रुष्णकांत दिक्षित लिखीत “मी आणि प्रसंग ” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आमदार राजळे यांच्या हस्ते थाटात संपन्न! ‌ ‌‌

0

अहमदनगर‌‌ :  (सुनिल नजन” चिफ ब्युरो”अहमदनगर जिल्हा) निव्रुत्त प्राचार्य आणि जेष्ठ विचारवंत लेखक क्रुष्णकांत लक्ष्मीकांत दिक्षित लिखीत “मी आणि प्रसंग” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव -पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या थाटात संपन्न झाला.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष जेष्ठ नेते अशोकभाउ गर्जे, जेष्ठ विधीज्ञ‌‌‌ आणि पाथर्डी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अॅडव्होकेट दिनकरराव पालवे,दांडगे शास्त्री, भगवानराव बांगर,” बई” पुस्तकाचे लेखक प्रा.उत्तमराव राजळे, मधुसूदन घळसासी, राहुल राजळे हे आवर्जून उपस्थित होते.हे पुस्तक लिहीन्या मागची कल्पना क्रुष्णकांत दिक्षित यांच्या पत्नी स्वर्गीय इंदुमती दिक्षित यांची होती पण या सोहळ्यासाठी त्या आज हयात नाहीत ही खंत त्यांचे सुपुत्र पुणे लेबर कोर्टाचे अॅडहोकेट अतुल दिक्षित यांनी व्यक्त केली. लेखक क्रुष्णकांत दिक्षित यांच्या दोन्ही विवाहित मुली सौ.माधुरी सबनीस आणि सौ.उत्तरा पोळ आणि नातवंडे हे आवर्जून उपस्थित होते. सुनबाई सौ अनिता दिक्षित या पुण्यातील पर्वती मतदारसंघातील भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा आहेत.त्यांनी प्रास्ताविकात सांगितले की हा कार्यक्रम पुण्यातही होउ शकत होता परंतु गावाकडच्या मातीत आपण लहानाचे मोठे झालो आणि गावाकडच्या माणसांची नाळ तुटू नये म्हणून हा सोहळा कासार पिंपळगाव तालुका पाथर्डी येथे आयोजित करण्यात आला होता. घरातील घरकाम करणाऱ्या सुरेखा शिंदे यांनी दिक्षित परिवारावर एक कविता लिहुन उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.अनेक वक्त्यांनी दिक्षित परिवाराशी आपली कशी नाळ जोडली गेली आहे हे आवर्जून सांगितले.आमदार मोनिकाताई राजळे यांनी हे पुस्तक वाचून सांगितले की ग्रामीण भागातील शहाणपण पुढच्या पिढीने कसे जोपासलं पाहिजे हेच या पुस्तकांतून दिक्षित अप्पा यांनी सांगितले आहे. पुढच्या पिढीने ते वाचून आत्मसात केले पाहिजे. या सोहळ्यासाठी दिक्षित परिवाराचे जावई कुलकर्णी साहेब,ओढ गावाकडची प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष शरद राउत, क्रुष्णकांत रघुनाथ दिक्षित, सुधाकर दिक्षित, वैशाली कुलकर्णी,देविदास राजळे, एकनाथ राजळे, वसंतराव भगत, सोपानराव तुपे,संभाजी राजळे, शिवाजी भगत,म्हातारदेव शेळके, दिलिप राजळे, वैभव दिक्षित,अप्पा राजळे यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुत्रसंचालन क्रुषिमीत्र संदिप राजळे यांनी केले. तर आभार अनिता दिक्षित यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here