गाव चलो अभियानातून विकासाच्या योजनांचा जनजागर :- डॉ भारती पवार

0

राज्य : पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या संकल्पनेतून गाव चलो अभियानांतर्गत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी आंबूर्डी,अभोना या गावात मुक्कामी राहून सुरुवात केली यावेळी मोठ्या उत्साहात ग्रामस्थांनी त्यांचं स्वागत केलं.
यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची माहिती डॉ भारती पवार यांनी घेतली.माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला दहा वर्षांची कामगिरी पूर्ण झाली आहे. सरकारने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. त्यात गेल्या दीड वर्षांपासून राज्यातील महायुती सरकारनेही महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजना गाव व शहरातील प्रत्येक बूथवरील लाभार्थीपर्यंत पोचविण्यासाठी अभियान हे राबविण्यात आले. तसेच तळागाळातील प्रत्येक मतदारापर्यंत मोदी सरकारचे १० वर्षातील प्रभावी कार्य, मागच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांची केलेली पूर्ती, विकसित भारताचा संकल्प सांगणाऱ्या यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी आदी सर्व माहिती मतदारांपर्यंत पोचविण्यात आली व मोदी सरकारची गॅरंटी काय आहे हे प्रत्येक नागरिकाला डॉ भारती पवार यांच्या हस्ते माहितीपत्र देऊन सांगण्यात आली.
त्या प्रसंगी दिपक खैरनार,विकास काका देशमुख,सोनाली राजे पवार,राजेंद्र ठाकरे, निशा शेवाळे,डॉ. अनिल महाजन, सुनिल खैरनार, कृष्णकुमार कामळसकर,गोविंद बापू कोठावदे, दिनकर आहेर,एस के पगार, दादा मोरे,प्रकाश कड़वे, चेतन निकम, यतिन पवार, काशिनाथ गुंजाळ, हेमंत पगार, शशिकांत खैरनार, हेमंत रावले, विशाल गुंजाळ,किशोर तोटे,शेखर जोशी ,सचिन मराठे,उदय पाठक, हेमंत पगार,हेमंत रावले,बबन वाघ,किशोर तोटे ,सुमित मुंडे, राजेंद्र राठोड, भीमराज चौरे, मनोज वेढणे, मनोहर बोरसे, चेतन निकम, गणेश मुसळे,कृष्णा पवार, रवींद्र अहिरराव, विकी जाधव,हेमंत जाधव, सागर जाधव, गौरव जंगम तसेच सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here