संत सेवालाल महाराज जयंती निमित्त सौ. अंजुमताई कांदे यांनी मतदार संघातील विविध बंजारा तांडा येथे उपस्थिती लावत जयंती उत्सवात भाग

0

नांदगाव :मतदार संघातील बंजारा समाजावर तालुक्याचे आमदार सुहास अण्णांचे विशेष प्रेम असल्यानेच ; आमदारांनी बंजारा समाजासाठी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याकडून तांडा सुधार निधिअंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून आणला असल्याचे प्रतिपादन समाजसेविका सौ.अंजुम सुहास कांदे यांनी केले.तालुक्यात संत सेवालाल जयंती मोठ्या प्रमाणावर व मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.सावरगाव,ढेकू खुर्द,पिंप्राळा,येथे झालेल्या कार्यक्रमात सौ.कांदे बोलत होत्या.सौ.कांदे पुढे म्हणाल्या की,या तांडा सुधार निधीतून प्रत्येक तांड्यावर पिण्याचे पाणी,स्री – पुरुष शौचालय,सिमेंट चे रस्ते,स्मशानभूमी,आदी कामे केली जाणार आहेत.तर या अगोदर ही आमदार निधीतून प्रत्येक तांड्यावर संत सेवालाल महाराज यांचा पुतळा व सभामंडप दिले आहेत.यापुढे ही हा विकासकामांचा झंजावात सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी बंजारा समाजातील अनेक मान्यवरांनी आमदार सुहास कांदे करत असलेल्या विकासकामांची स्तुती केली.त्यात एन.के.राठोड,नारायण पवार,भगवान सातपुते,उमेश मोरे, राजेंद्र चव्हाण,समावेश होता.याप्रसंगी महिला आघाडी तालुकाप्रमुख सौ. विद्या जगताप,शहरप्रमुख सौ. रोहिणी मोरे,सौ.पूजा छाजेड,सौ.संगीता बागुल,निशा चव्हाण,किरण कांदे,अण्णा मुंडे,रमेश काकळीज,दिपक मोरे,लक्षण राठोड,आबासाहेब भुसारे,राम राठोड,चेयरमन काळू शिंदे,सोमनाथ चव्हाण,शांताराम राठोड,वाल्मिक निकम,अंबादास निकम,रमेश माळी,धनराज जाधव,श्यामजी जाधव,सचिन माळी,विजय राठोड,ज्ञानेश्वर चव्हाण,बाबुराव चव्हाण,बाबू चव्हाण,गोपालाल राठोड,अवलीबाई चव्हाण,शेवन्ताबाई चव्हाण आदिंसह शेकडो बंजारा समाज बांधव उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here