विरारमध्ये ऐतिहासिक सम्राट अशोक कालीन धम्मलिपीच्या पहिल्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

0

विरार (प्रतिनिधी – महेश्वर तेटांबे)केंद्र शासनाच्या नवीन धोरणानुसार चाळीस टक्के नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याची मुभा मिळाली आहे त्यात धम्मलिपीचा पदविका अभ्यासक्रम या शैक्षणिक वर्षात आम्ही नक्की सुरू करण्याचा प्रयत्न करू आणि धम्मलिपिला आजच्या विद्यार्थ्यापर्यंत पोचविण्यास हात भार लावू असे प्रतिपादन पीपल्स एज्युकेशन ट्रस्टच्या सिद्धार्थ महाविद्यालय, मुंबईचे प्राचार्य डॉ. अशोक सुनतकरी यांनी केले. ते सम्राट अशोक कालीन धम्मलिपीच्या पहिल्या राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन करताना विवा महाविद्यालय, विरार येथे बोलत होते.सम्राट अशोक कालीन धम्मलिपीमधे लिप्यांतरीत मुक्ती कोन पथे या पुस्तकाच्या प्रकाशनात आणि पुस्तकाच्या 20,000 प्रती महाराष्ट्रातील 4000 महाविद्यालयामध्ये मोफत वाटण्याच्या योजनेत वसईचे आमदार हितेंद्रजी ठाकूर यांची अतिशय महत्वाची भूमिका असल्याचे प्रास्ताविक करताना संपादिका छाया पाटील यांनी सांगून धम्मलिपीचे पहिले चर्चासत्र घेण्यामागची मूळ भूमिका आणि उपयोगिता स्पष्ट केली.हे चर्चासत्र विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट, संचालित विवा महाविद्यालय विरार, भगवा फाउंडेशन मुंबई आणि निर्मिती प्रकाशन कोल्हापूर याच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. 28.1.2024 रोजी देशभरातील पाली भाषा आणि धम्मलिपीच्या अभ्यासकांच्या साक्षीने अतिशय उत्साहात पार पडले.भारतातील प्राचीन लिप्यांच्या संवर्धनात सम्राट अशोक कालीन धम्मलिपीमधे लिप्यांतरीत झालेले मुक्ती कोन पथे या पुस्तकाचा अतिशय मोलाचा वाटा मान्य करावाच लागेल आणि असे कार्यक्रम सातत्याने व्हावेत असे विचार कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात केंद्रीय विधी आयोगाचे माजी सदस्य आणि अनेक महाविद्यालयांचे प्राचार्य पद भूषविलेले डॉ. डी. एन. संदानशिव यांनी मांडले. वयाच्या 84 व्या वर्षी चर्चासत्रात त्यांनी उत्साहपूर्ण, सक्रिय आणि पूर्ण वेळ देवू सर्वांना आश्चर्यचकित केले.तत्पूर्वी निर्मिती प्रकाशनाचे अनिल म्हमाने, वसई विरार मनपाचे माजी सभापती निलेश देशमुख, पाली अभ्यासक सतीश पवार आणि प्रा. डॉ. कविता पाटील यांनी आपले विचार मांडून आयोजन समितीतर्फे या सर्वांनीही चर्चासत्राला महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि दिल्ली येथून उपस्थित सर्व अभ्यासकांचे स्वागत केले.चर्चासत्राच्या दुसऱ्या सत्रात नवी दिल्ली येतील राष्ट्रीय पांडुलिपी मिशनचे संचालक डॉ. अनिर्वान दश यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले आणि धम्मलिपीच्या उद्गमा विषयीची एकूणच माहिती देवून उपस्थित अभ्यासकांच्या प्रश्नांना उत्तरे ही दिली. या पश्चात प्रा. राहुल राव, नूतन पोल, निलेश जाधव, प्रा. विजय मोहिते, वंदना झाल्टे, नेहा राऊत, डॉ. अर्चना अडसूळ यांनी शोध निबंधाचे वाचन केले.त्यानंतर धम्मलिपीचा प्रचार प्रसारात ज्यांचे योगदान आहे अश्या धारवाड येथील इरोड. पब्बजो रवीकुमार, धम्मसिरी फाउंडेशनचे रत्नागिरी येथील रवींद्र मिनाक्षी मनोहर सावंत आणि मूळ लातूरचे बोधिसत्व यूट्यूब चॅनलचे सागर भगवान कांबळे यांना चक्कवत्ती राया असोको पुरस्कार 2024 ने सन्मानित करून त्याच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या मुलाखती झाल्या.कार्यक्रमाच्या ठिकाणी धम्मलिपीतील स्वर आणि व्यंजनांच्या अतिशय सुन्दर रांगोळ्या काढल्या होत्या आणिडॉ. महादेव इरकर आणि प्रा. कविता पाटील यांनी उत्कृष्ट पद्धतीने सूत्रसंचलन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here